पाच दिवसांत चार धरणांतील पाणीसाठा साडेपाच टीएमसीने वाढला

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 18 जुलै 2017

आज खडकवासला धरण साखळीतील सकाळी 6 वाजताची स्थिती
धरणाचे नाव : 24 तासातील पाऊस (मिलिमीटर मध्ये) /१जूनपासूनचा पाऊस मिमी/धरणसाठा टीएमसी मध्ये / टक्केवारी
टेमघर- 74/1344/0.84/22.77
पानशेत- 55/905/6.82/64.02
वरसगाव- 55/905/4.94/38.53
खडकवासला- 23/287/1.06/53.78
चार धरणातील एकूण पाणीसाठा- 13.66टीएमसी, 46.87टक्के
मागील वर्षीच्या पाणीसाठा- 15.14टीएमसी, 51.93टक्के

खडकवासला : मागील पाच दिवसापासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून १३ जुलैपासून आज मंगळवार सकाळपर्यंत चार धरणांतील पाणीसाठा देखील साडेपाच टीएमसीने वाढला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

गुरुवार 13 जुलै सकाळपासून 18 जुलै मंगलवार सकाळी या पाच दिवसात टेमघर येथे 380मिलिमीटर, पानशेत येथे 299, वरसगावला 303 तर खडकवासला येथे 93 मिलिमीटर पाऊस पडला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. या चार ही धरणात १३ जुलै रोजी 8.37 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. सोमवारी संध्याकाळी 13.66टीएमसी झाला आहे. ही वाढ 5.29 टीएमसी झाली. त्याच बरोबर या चारपाच दिवसात 0.25 टीएमसी शहर आणि अन्य पाणी योजनेसाठी सोडले. एकूण वाढ मिळून 5.54टीएमसी झाली आहे. 

पावसाची संततधार 
धरण क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर बऱ्यापैकी होता. परंतु संततधार मात्र कायम होती. मागील 24 तासात मंगळवारी सकाळी टेमघर येथे 74 वरसगाव ला 55 व पानशेत येथे 55 व खडकवासला येथे 23मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: pune news water reservoir dam water storage