esakal | पुणे : कोविड सेंटरमधल्या 'ब्रदर'ने केला रेमडेसिव्हीरचा काळाबाजार!

बोलून बातमी शोधा

Corona_Remdisivir

- पुणे पोलिसांच्या दरोडा व वाहनचोरी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाची संयुक्तीक कारवाई 

पुणे : कोविड सेंटरमधल्या 'ब्रदर'ने केला रेमडेसिव्हीरचा काळाबाजार!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागलेले चित्र आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांना ते इंजेक्‍शन महागड्या दराने विक्री करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या कोरोना उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यास दरोडा आणि वाहन चोरी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. अशा पद्धतीने रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक करून त्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. 

पृथवीराज संदीप मुळीक (वय 22, रा. साईप्रसाद सोसायटी, दत्तनगर, कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अतिश सरकाळे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मुळीकसह एका परिचारिकेविरुद्ध औषध किंमत नियंत्रण, जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कायद्याचे उल्लंघन, औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर परिसरामध्ये एक व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक रेमडेसिव्हीर हे इंजेक्‍शन जादा दराने रुग्णाच्या नातेवाईकास विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर दरोडा व वाहन चोरी पथकास मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिस कर्मचारी बनावट ग्राहक बनून इंजेक्‍शन खरेदी करण्यासाठी घटनास्थळी गेला. त्यावेळी तेथे आलेल्या मुळीक हा संबंधीत इंजेक्‍शन बाजारभावापेक्षा जादा दराने विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनबाबत विचारणा केली. त्यावेळी तो दत्तनगर येथील साईप्रसाद कोविड सेंटरमध्ये "ब्रदर' म्हणून काम करत असल्याची माहिती दिली.

चुकीला माफी नाही; चीनने ‘अलिबाबा’ला ठोठावला तब्बल १८.२ अब्ज युआनचा दंड!​

तसेच त्यास हिंजवडी येथील भूमकर चौकातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या त्याच्या परिचारीका मैत्रीणीकडून ते इंजेक्‍शन मिळाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलिस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक विवेक खेडेकर, निलेश खोसे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

J&K: १४ वर्षीय दहशतवाद्याला कंठस्नान; चकमकीत आतापर्यंत १० ठार

रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा गैरप्रकार आढळल्यास पोलिसांना द्या माहिती 
शहरात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी मोहिती हाती घेतली आहे. त्यासाठी सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेची दहा पथके कार्यरत आहेत. संबंधीत इंजेक्‍शनची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्यास नागरीकांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. पोलिसांकडून अशा व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)