esakal | मंगळसूत्र हिसकावून ते पळाले; समोरून आले गावकरी अन् मागून पोलिस!
sakal

बोलून बातमी शोधा

Chain-Snatching

ग्रामस्थ रस्त्यावर येऊन येऊन उभे राहिल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी नाकाबंदी केली. चोर पुढे तर...पोलिस पाठीमागे.

मंगळसूत्र हिसकावून ते पळाले; समोरून आले गावकरी अन् मागून पोलिस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव निंबाळकर (पुणे) : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन् चोरट्यांचा पाठलाग सुरू झाला

शनिवारी (ता. 28) रात्री साडेआठच्या सुमारास वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यासमोर ही घटना घडली. दीपाली स्वप्नील जाधव या आपल्या दोन लहान मुलांना घेऊन नीरा-बारामती मार्गावरून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यासमोरून घराकडे चालल्या होत्या.

- पुणे : 'न्यू इअर सेलिब्रेशन'साठी सिंहगडला जायचंय? मग हे वाचाच!

नीरा बाजूने पल्सर दुचाकीवर तिघे जण आले. हा रस्ता कुठे जातो याची विचारपूस करून पुढे गेले पुन्हा परत वळून महिलेला गाडी आडवी लावत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. दीपाली मोठ्याने ओरडली, लहान मुलेही ओरडली. जवळच असलेल्या पोलिस ठाण्यात आरडाओरडा ऐकू गेल्याने पोलिस कर्मचारी सलमान खान, सहायक फौजदार शरद वेताळ, विठ्ठल कदम, ज्ञानेश्‍वर सानप, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, सोमनाथ लांडे बाहेर आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. 

- काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी फिक्स; 'हे' दहा आमदार घेणार शपथ

'चोर पुढे तर...पोलिस पाठीमागे...'

चोरांची दुचाकी सोमेश्‍वरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व पोलिस पाटलांना आणि ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. ग्रामस्थ रस्त्यावर येऊन येऊन उभे राहिल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी नाकाबंदी केली. चोर पुढे तर...पोलिस पाठीमागे...असा सुमारे पंधरा किलोमीटरचा प्रवास चालू होता. अखेर नीरा-मोरगाव मार्गावरील चौधरवाडी हद्दीत दुचाकीला दोन्ही बाजूने पोलिसांनी घेरले. दुचाकीवरून चोरटे खाली पडले. अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी सोडून चोर पळून गेले. 

- 'न्यू इअर'च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क; कराताहेत 'अशी' कारवाई

पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचारी माळरानावर रात्रभर चोरटे शोधत होते. अखेर सकाळी विजय दत्तात्रेय भुजबळ (रा. निरवांगी ता. इंदापूर) हा हाती लागला. दुचाकीसह त्याला पोलिस ठाण्यामध्ये आणले. साथीदांची नावे मिळताच पोलिस पथके पाठवण्यात आली. तात्या घोडके (रा. वालचंदनगर, ता. इंदापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी स्वप्नील बबन वाघमोडे (रा. काळेवस्ती रेडणी, ता. इंदापूर) याचा शोध सुरू आहे. गुन्हा दाखल प्रक्रिया चालू केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

loading image