Pune News: सुविधा मिळतायेत तर कामात गुणवत्ता दाखवा ; पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

म्हाळुंगे पोलिस स्टेशन येथे महिला कक्षाचे उद्घाटन
Pune News
Pune Newssakal

Pune News : पोलिस खाते आणि खाजगी संस्था यांच्या माध्यमातून महिला कर्मचारी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.त्यामुळे त्यांनी आता कामात जास्त गुणवत्ता दाखवावी असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी म्हाळुंगे इंगळे (ता.खेड ) येथे पोलिस कर्मचाऱ्यांना केले.(Latest Pune News)

Pune News
Pune : पुण्यातील डार्क चॉकलेटची जगभराला भुरळ

महिला कर्मचारी यांना पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणाऱ्या महिला कक्ष आणि मुद्देमाल कक्ष या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.रोटरी क्लब ऑफ एनआयबीएम आणि नेक्स्टईअर कंपनी यांच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावेळी चौबे म्हणाले की,प्रत्येक क्षेत्रात आणि पोलिस दलात देखील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या वाढत आहे.आज उपलब्ध केलेल्या मूलभूत सुविधा ही कौतुकास्पद बाब आहे.कर्मचाऱ्यांत महिलांचे प्रमाण एक तृतीयांश असावे यासाठी या सुविधा फायदेशीर ठरतील.तसेच पोलीस पाटील हा पोलिस यंत्रणेचा डोळा आणि कान आहे.(Marathi Tajya Batmya)

Pune News
Osho Ashram Pune : पुण्यातील ओशो आश्रमाबाहेरचं आंदोलन भोवल! १२५ आनुयायांवर गुन्हा दाखल

अनिल वाळिंबे म्हणाले की आमचा हा १२ वा प्रकल्प आहे.यात महिलांसाठी वॉश रूम,लॉकर,आराम कक्ष,चेंजिंग रूम,महिला कर्मचाऱ्याच्या लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

यावेळी मनीष भसनाळे,ज्ञानेश्वर साबळे,मनीषा भंडरवाड यांनी विचार व्यक्त केले.यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे,मनीष भसनाळे,विवेक पाटील,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे,किशोर पाटील,दत्तात्रय जाधव, म्हाळुंगेच्या सरपंच मंगल भोसले,पोलिस पाटील संघटनेच्या तृप्ती मांडेकर,अर्चना म्हाळुंगकर,रत्ना पिंगळे-देशमुख यांच्यासह विविध गावचे पोलिस पाटील,स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

अजित वाळिंबे यांनी आभार मानले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com