
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तिघांना दुय्यम दर्जाची व बनावट सॅनिटायझरप्रकरणी अटक केल्यानंतर तत्काळ मुंबईतील साकीनाका येथील कंपनीवर शनिवारी (ता.१४) छापा घातला. तेथून आणखी सव्वा दोन लाख रुपयांचा माल जप्त केला. त्याचबरोबर कारखाना चालविणाऱ्या दोघांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
दुय्यम दर्जाची व बनावट सॅनिटायझर बनवून ती ब्रॅंडेड कंपनीची असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या अजय शंकरलाल गांधी (वय 39, रा. शिवदर्शन), मोहन वाघाराम चौधरी (वय 36, रा. शास्त्रीनगर येरवडा) व सुरेश प्रेमजी छेडा (वय 39, रा. शनिवार पेठ) या तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकातील पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली होती.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी दिवसभर मुंबईतील साकीनाकार परीसरामध्ये बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्या सिनर्जी हायजेनीक कॉर्पोरेशन या कंपनीचा शोध घेऊन तेथे छापा घातला. पोलिसांनी तेथून पराग दोशी व हरेश बेरा या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये व नव्याने समाविष्ट झालेल्या जीवनावश्यक वस्तूंबाबत गैरप्रकार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर शुक्रवारी एक लाखांचा, तर शनिवारी मुंबईतुन सव्वा दोन लाख रुपयांचा, असा एकूण सव्वा तीन लाख रुपयांचा माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. सॅनिटायझर, मास्कचा गैरप्रकार करणाऱ्यांबाबत माहिती कळवा
दुय्यम दर्जाचे व बनावट सॅनिटायझर, मास्कची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
दरम्यान, सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्ऍप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.