बायको मुलाला भेटू देत नाही म्हणून घेतला निर्णय...

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

चांदनी चौकात एक व्यक्ती पुलावरून उडी मारून आत्महत्या करीत आहे. अशी माहिती पोलिस मुख्यालयाकडून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात मिळाली. तातडीने फौजदार अशोक येवले, कर्मचारी सद्दाम शेख, ऋषिकेश कोळप, बीट मार्शल रमेश चव्हाण, फिरोज शेख हे तातडीने घटनास्थळी पोचले. त्यावेळी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी ताब्यात घेतले. 

वारजे माळवाडी : 'बायको मुलाला भेटू देत नाही. मी मुलाशिवाय जगू शकत नाही.' असे म्हणत त्यांनी चौकातील पुलावरून खाली महामार्गावर उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचविण्यात वारजे-माळवाडी पोलिसांना यश आले आहे. ही घटना सोमवारी साडेनऊ वाजता घडली.

‘कुमारी मातां’ची अघोरी कहाणी

चांदनी चौकात एक व्यक्ती पुलावरून उडी मारून आत्महत्या करीत आहे. अशी माहिती पोलिस मुख्यालयाकडून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात मिळाली. तातडीने फौजदार अशोक येवले, कर्मचारी सद्दाम शेख, ऋषिकेश कोळप, बीट मार्शल रमेश चव्हाण, फिरोज शेख हे तातडीने घटनास्थळी पोचले. त्यावेळी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी ताब्यात घेतले. 

पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

याबाबत त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, पत्नीशी भांडण झाल्यानंतर ती मुलाला घेऊन माहेरी गेली. त्या घटनेने चार महिने झालेत. ती मुलाला भेटून देत नाही. पती नाराज झाला आहे. तसेच त्याने मुलाशिवाय मी जगू शकत नसल्याने त्यांना आत्महत्येचा मार्ग निवडला होता. 

चीनमधील वुहान शहरातून येणारा प्रवासी विलगीकरण कक्षात

दरम्यान, त्याच्या नातेवाईकांना फोन केले. तो बावधन येथे राहणारा असल्याने त्याला हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बावधन पोलिस चौकीतील अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यात दिले आहे. 

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police rescued One who attempt to suicide by jumping down from the Warje Malwadi bridge