पुणेकरांना भरली हुडहुडी; राज्यातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.6 ते 3 अंश सेल्सिअस पर्यंत घट झाल्याचे भारतीय हवामान खात्याने नमूद केले.

पुणे : शहरात हिवाळ्यातील आजवरचे सर्वाधिक कमी तापमान शिवाजीनगर येथे नोंदविले गेले. सकाळी साडेआठ वाजता तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदले गेल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.12) राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमानाचे शहर म्हणून पुण्याची नोंद झाली.

कुणाल कामराच्या अडचणीत भर; खटला दाखल करण्यास ऍटर्नी जनरलची परवानगी​

नोव्हेंबरच्या दुसऱ्याच आठवड्यात शहरातील किमान तापमान हे एक अंकी नोंदविण्यात आले असून ऐन दिवाळीत शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. शहरातील किमान तापमान गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घसरत असून गुरुवारी सुमारे पाच अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट झाली. तसेच लोहगाव येथे 12.2 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

शहरात मंगळवारपासूनच किमान तापमानाचा पारा घसरत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर थंडी जाणवत आहे. दरम्यान पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका असाच कायम राहणार असून किमान तापमान हे 11 ते 12 अंश सेल्सिअसच्या जवळपास जाण्याची शक्‍यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळीचा फराळ केल्याबरोबर सकाळी व्यायामाला बाहेर पडण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे.

'भाजपने पुढील चार वर्षे स्वप्नच पाहत राहावे'; जयंत पाटील यांचा भाजपला टोला​

राज्यात थंडीचा कडाका वाढणार
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1.6 ते 3 अंश सेल्सिअस पर्यंत घट झाल्याचे भारतीय हवामान खात्याने नमूद केले. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मंगळवारनंतर जम्मू काश्‍मीर, लडाखसारख्या हिमालयातील भागांमध्ये जोरदार पाऊस किंवा बर्फवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश केल्यास थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता आहे.

Bihar Election: सत्ता कुणाचीही असो, बिहारमध्ये 'जंगलराज'च!​

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे : 9.8
सांगली : 13.3 
कोल्हापूर : 16 
मुंबई : 22.8 
औरंगाबाद : 12.8 
नागपूर : 18.3 
नाशिक : 10.4 
महाबळेश्वर : 13.4 
चंद्रपूर : 11.2

गेल्या तीन दिवसांमध्ये पुणे शहरातील किमान तापमान :
दिनांक : किमान तापमान (अंश सेल्सिअस)
10 नोव्हेंबर : 11.3
11 नोव्हेंबर : 10.6
12 नोव्हेंबर : 9.8

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune recorded the lowest minimum temperature in Maharashtra on Thursday 12th Nov 2020