पुणेकरांनो, पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण घटलं; विभगीय आयुक्तांनी केला दावा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

गणेशोत्सवानंतर शहरात दररोज 32 टक्‍क्‍यांवर पोचलेले कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटून 24 टक्‍क्‍यांवर आले आहे, असा दावा प्रशासनाकडून मंगळवारी करण्यात आला. गणेशोत्सवात नागरिक रस्त्यावर एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हे प्रमाण वाढले होते. परंतु हे प्रमाण येत्या आठवड्यात आणखी कमी होईल. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पुणे - गणेशोत्सवानंतर शहरात दररोज 32 टक्‍क्‍यांवर पोचलेले कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटून 24 टक्‍क्‍यांवर आले आहे, असा दावा प्रशासनाकडून मंगळवारी करण्यात आला. गणेशोत्सवात नागरिक रस्त्यावर एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हे प्रमाण वाढले होते. परंतु हे प्रमाण येत्या आठवड्यात आणखी कमी होईल. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सवानंतर पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले होते. 17 सप्टेंबरपर्यंत बाधितांची संख्या दररोज एक हजार 900 इतकी होती. त्यानंतर 26 सप्टेंबरपर्यंत ती एक हजार 700 वर आली. सध्या हे प्रमाण दीड हजारांच्या जवळपास आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण 15 टक्‍के इतके आहे. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 31 टक्‍क्‍यांवर गेली आहे, असे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी सांगितले. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

सध्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रमाण घटले आहे का, याबाबत महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार म्हणाले, कोरोना चाचण्या कमी करण्याचा आणि बाधित रुग्णांची टक्‍केवारी कमी होण्याचा संबंध नाही. तर, ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण वाढविण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून बाधित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. हॉटस्पॉट भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन बेड्‌स आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

ससूनमध्ये तीन ऑक्‍टोबरपासून रुग्ण दाखल 
ससून रुग्णालयातील नव्या इमारतीमध्ये पहिल्या टप्प्यात 560 बेड्‌स सुरू करण्याचे नियोजन आहे. दोन ऑक्‍टोबरपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर 3 ऑक्‍टोबरपासून रुग्ण दाखल करण्यास सुरवात होईल. जम्बो रुग्णालयातही पूर्ण क्षमतेने बेड्‌स सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे राव यांनी सांगितले. 

35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल नाही 
कोरोनामुळे मृत्यू झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जम्बो रुग्णालय चालविण्याची जबाबदारी असलेल्या तत्कालीन लाइफ लाईन कंपनीच्या संचालकाकडून दोन दिवसांत उत्तर मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune residents number of positive patients decreased claimed Divisional Commissioner