पुणे आरटीओने दुचाकी, चारचाकी परवान्यासाठीच्या मुदतीत केली वाढ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वापराच्या परवान्यासाठीच्या कोट्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त नागरिकांना परवाने उपलब्ध होणार आहेत.

पुणे - नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वापराच्या परवान्यासाठीच्या कोट्याची मुदत वाढविली आहे. त्यामुळे दररोज जास्तीत जास्त नागरिकांना परवाने उपलब्ध होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुचाकी आणि चार चाकी वाहन चालविण्यासाठीच्या परवान्यासाठी सध्या दररोज २४० चा कोटा होता. तो आता प्रत्येकी ३०० नागरिकांसाठी केला आहे. व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी दररोज १०० नागरिकांना परवाना दिला जात होता. त्याचे प्रमाण २० ने वाढविण्यात आले आहे. गुरुवारपासून (ता. १५ ऑक्‍टोबर) या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. 

Pune Rain Updates : सहकारनगर, धनकवडीत पावसाचा हाहाकार; 227 मिलीमीटर पावसाची नोंद  

चार चाकी वाहनांचा पक्का परवाना हवा असल्यास त्यासाठी पुणे-नाशिक रस्त्यावरील भोसरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग आणि ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) येथे नागरिकांना मिळू शकेल. जड वाहनांच्या चालकांनाही तेथे परवाना मिळू शकेल. तर, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठीचा पक्का परवाना आळंदी रस्त्यावरील कार्यालयात मिळेल. 

कर्जासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करूनही मिळाले नाही कर्ज; काय आहे प्रकार वाचा

अन्य सर्व प्रकारचा परवाना आळंदी रस्त्यावरील आरटीओ कार्यालयात उपलब्ध होणार आहे. याबाबत शिंदे म्हणाले, ‘‘काही नागरिकांना दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा एकत्र परवाना हवा असतो. तो त्यांना आळंदी रस्त्यावरील कार्यालयात मिळू शकेल. तसेच काही नागरिकांना फक्त चार चाकी वाहनांचाच परवाना हवा असल्यास त्यांना भोसरीतील ‘आयडीटीआर’ येथे मिळू शकेल.

पुणेकरांनो, घरातच राहा! पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट

कोरोनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करावी. त्याबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी नागरिकांनी करावी.
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune RTO extends deadline for two wheeler and four wheeler licenses