स्वारगेटवरून कात्रज आता 15 मिनिटांत गाठणे शक्‍य 

स्वारगेटवरून कात्रज आता 15 मिनिटांत गाठणे शक्‍य 

पुणे - स्वारगेट ते कात्रज चौक हे सुमारे सहा किलोमीटरचे अंतर आता 15 ते 18 मिनिटांमध्ये गाठणे शक्‍य होणार आहे. कारण या मार्गावर शुक्रवारपासून (ता. 1) बीआरटी सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बीआरटी मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्यामुळे ही सेवा पीएमपीकडून सुरू करण्यात येणार आहे. 

दोन दिवसांपूर्वीच या बीआरटी मार्गाची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या केली होती. तसेच या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला होता. कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी एक जानेवारीपासून बीआरटी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार गेल्या तीन दिवसांमध्ये या मार्गावरील सर्व अडचणी आणि त्रुटी प्रशासनाकडून दूर करण्यात आल्या आहेत. 

या मार्गाच्या कामाची निविदा चार वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने 2018 साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र आचारसंहिता आणि या रस्त्यावरील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामांमुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून वाहतुकीसाठी हा मार्ग खुला  करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पीएमपीचे अधिकारी दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीकडून 206 बसचे नियोजन 
स्वारगेट ते कात्रज मार्गावर 2006 मध्ये बीआरटी सुरू केली होती. पीएमपीचे जे मार्ग नफ्यात आहेत. त्यामध्ये या मार्गाचा समावेश होता. परंतु महापालिकेतील राजकारणात ती अडकल्यामुळे अनेकदा सुरू होऊन ही सेवा पुन्हा बंद करावी लागली होती. त्यामुळे सहा किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी सुमारे 30 ते 35 मिनिटांचा कालावधी लागत होता. आता बससाठी स्वतंत्र मार्ग असल्यामुळे हे अंतर आता 15 ते 18 मिनिटांमध्ये गाठणे शक्‍य होणार आहे. या मार्गावर एकूण 206 बसचे नियोजन पीएमपीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे दोन मिनिटाला एक बस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com