esakal | पुणे : म्हणून 'कात्रजचा खून झाला'; आता व्हिडिओ व्हायरल । Katraj Banner
sakal

बोलून बातमी शोधा

katraj

पुणे : म्हणून 'कात्रजचा खून झाला'; आता व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : कात्रज चौकात एका खाजगी जागेवर अज्ञात व्यक्तीनी 'कात्रजचा खून झाला' अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले होते. त्यानंतर कात्रजचा खून का झाला? याचा उलगडा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कात्रजमधून साक्षात यमराजांचा भ्रमणध्वनी कुबेरदेवांना गेला असल्याची सुरवात या व्हिडिओत करण्यात आली आहे.

हेही वाचा: जागतिक हृदय दिवस : हृदयाशी व्हा ‘डिजिटली कनेक्ट’

या व्हिडिओमध्ये यम कुबेरदेवाला बोलत असल्याचे दिसत आहे. यात यम कुबेरदेवाला यमलोकातले त्याचे मुख्यालय बदलून कात्रजमध्ये केले असल्याचे सांगत आहे. त्यामुळे यमाचा मुक्काम आता कात्रजला कात्रजचौकात हलविले असल्याचे सांगत आहे. यम पुढे म्हणतो, कात्रजला आलो अन् लई मोठे घबाड हाताला लागले. इथे खूप वाहतूक कोंडी आहे.

अपघात मोठे होतात. आमचा रेडासुद्धा नो पार्किंगमध्ये लावल्याने उचलून नेला. कात्रज चौकात डोळ्यादेखत माणसे मरताना पाहिली आणि ठरवलं यमराजाचे मुख्यालय आता कात्रजलाच पाहिजे. या व्हिडिओमधून यम कुबेरदेवाला प्रेत उचलून नेण्यासाठी खर्च वाढला असून त्यामुळे निधीत भरीव तरतूद करण्याची मागणी करताना दिसत आहे. तसेच यम कात्रजला भेट देऊन टार्गेट कसे पूर्ण होते हे एकदा पाहाच असेही म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

पुढे या व्हिडिओत एक मावळा बोलताना दिसत आहे. तो मावळा म्हणतो की, कीती जणांचा जीव घ्यायचा ठरवला आहे? असे किती दिवस डोळे झाकायचे ठरवले आहे? आमचा खून झाला आहे, या कात्रजचा खून झाला आहे. आजपर्यंत या चौकात २७५ बळी गेले आहेत. अजून किती जणांचा बळी घेणार आहात? ही अघोषित हत्या नाही तर काय आहे? एक गोष्ट ध्यानात घ्या? पुण्याच्या नकाशातून कात्रजला जर उपरा समजून बेदखल करणार असाल तर रितसर कात्रजचा घाट दाखवला जाईल असेही म्हटले आहे.

त्याचसोबहत आता माघार नाही एसेही म्हटले असून एका कात्रजकराच्या वतीने हे सवाल व्हिडिओच्या माध्यमांतून उपस्थित करण्यात आले असल्याचे दाखविण्यात आले आहे. दरम्यान, काल चौकात २० बाय ३०चे होर्डिंग लावण्यात आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्या चर्चांना एकप्रकारे या व्हिडिओच्या माध्यमांतून उत्तर देण्यात आल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे.

loading image
go to top