विद्यार्थ्यांना यंदा मोफत गणवेश नाही; खरेदी स्थगितीमुळे कोट्यवधीची बचत

pune uniform
pune uniform

पुणे- कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील मोफत गणवेशाला मुकावे लागणार आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शाळा सुरू होऊ न शकल्याने यंदाच्या गणवेश खरेदी न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यामुळे गणवेश खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे. केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षण मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्यात येतात.यासाठी प्रति गणवेष ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रत्येकी ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

दरम्यान, केवळ सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी हे मोफत गणवेशापासून वंचित राहत असत. जिल्हा परिषद शाळांमधील सर्व विद्यार्थी हे १३ वर्षे वयाच्या आतील असतात. त्यामुळे या गणवेशामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासून दुजाभावाची भावना निर्माण होऊ नये, या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला होता. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे यंदा मोफत गणवेशासाठी समग्र शिक्षण मोहिमेअंतर्गत प्राप्त झालेला हा कोटी आणि जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेला ४ कोटी असा एकूण १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. दरम्यान, मागील वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांपासून आजतागायत कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. शिवाय चालू शैक्षणिक वर्षाचाही उणेपुरा एका महिनाच शिल्लक राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाची गणवेश खरेदी स्थगित करण्यात आली आहे.

कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात शाळा पूर्णवेळ शाळा भरू शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना आतापर्यंत मोफत गणवेशाचे वाटप करता आलेले नाही. सध्या शैक्षणिक वर्षाचा केवळ एकच महिना शिल्लक राहिला आहे. यामुळे यंदाच्या वर्षातील गणवेश खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे म्हणाले.

मोफत गणवेश वाटप दृष्टीक्षेपात

- जिल्हा परिषद शाळांतील एकूण विद्यार्थी --- ३ लाख १३ हजार ४७८
- एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ---- १ लाख १९ हजार ९०१
- झेडपी शाळांतील मुलींची संख्या --- १ लाख १३ हजार ८१९
- अनुसूचित जाती प्रवर्गातील मुले --- २० हजार ४६९
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले --- १२ हजार ४६४
- दारिद्र्यरेषेखालील मुले --- ७ हजार २१०
- समग्र शिक्षण मोहिमेअंतर्गत एकूण पात्र विद्यार्थी --- १ लाख ५३ हजार ९६२
- सर्वसाधारण गटातील एकूण मुले --- ७९७५८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com