पुणे विद्यापीठाने सुरु केलेल्या समुपदेशन केंद्रांशी संपर्क' होईना; 9 पैकी केवळ...

Pune university started Counseling centers for students were not contacted
Pune university started Counseling centers for students were not contacted

पुणे : विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसदर्भता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व शंकांचे निरसन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. विद्यापीठाने एकुण नऊ केंद्र तीन जिल्ह्यात सुरू केले, त्यापैकी केवळ तीन ठिकाणीच दिलेले मोबाईल फोन उचलले गेल्याचे 'सकाळ'च्या पहाणीत समोर आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार व राज्य सरकारच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शंकांचे निरसन  व परीक्षांचे नियोजन यासाठी माहिती देण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने पुणे जिल्ह्यासाठी चार, नाशिक दोन आणि नगर साठी तीन केंद्र चालू केले. 

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

पुण्यातील एच. व्ही. देसाई, काशीबाई नवले फार्मसी महाविद्यालय, इंदापूर महाविद्यालय आणि वाघाेलीतील जेेएसपीएम या चारीही ठिकाणी मोबाईलवर संपर्क साधला. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. केवळ नवले महाविद्यालयाने तुमचे प्रश्न ईमेल करा १५ मे नंतर त्यास उत्तर दिले जाईल असा मेसेज पाठविण्यात आला.
 
मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

नाशिकच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयातील समुपदेशन केंद्रातील डॉ. एम. पी. शिंदे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी दुपारपर्यंत सुमारे ७५ जणांनी संपर्क साधल्याचे सांगितले.
तर के. के. वाघ महाविद्यालयातील केंदाशी संपर्क होऊ शकला नाही. 

बाप रे ! पुण्याने ओलांडला कोरोनाग्रस्तांचा तीन हजारांचा टप्पा

नगर येथील न्यू आर्टस काॅमर्स  अँड सायन्स महाविद्यालयाचा मोबाईलचे केवळ नऊच नंबर दिल्याने तो चुकीचा आहे. तर लँडलाईनवर कोणीही प्रतिसाद दिला नाही. डाॅ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य. राजेंद्र कल्लापूरे यांच्याशी संपर्क झाला त्यांनी २०० विद्यार्थ्यांशी सकाळपासून चर्चा केल्याचे सांगितले. तर संगमनेर येथील  डी.जे. मालपाणी महाविद्यालय येथे संपर्क साधला असता तीन चार जणांचे फोन आले होते असे सांगण्यात आले. 
Fight Against Corona :आता गिर्यारोहक करणार कोरोना विरोधात चढाई
 
दरम्यान, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सर्व केंद्र सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात  विद्यार्थ्यांकडून फोन येत आहेत. यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. " असे सांगितले. 

पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची सेवा बंद;आता खासगी बसचाच आधार​

बॅकलाॅगचे काय होणार? 
'सकाळ'ने के. टी. एम. एच. महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. शिंदे व विखे पाटील काॅलेजये प्रा. कल्लापूरे म्हणाले, सकाळ पासून अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले त्यामध्ये बहुतांश फोन हे बॅकलाॅगची परीक्षा कधी होणार, कशी होणार, प्रथम वर्षाचे विषय राहिलेले असताना तृतीय वर्षाला प्रवेश मिळणार का? यासह अनेक फोन येऊन गेले आहेत. विद्यापीठाकडून मिळालेल्या सूचनांप्रमाणे उत्तर दिऊन त्यांचे समाधान केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com