

Students Raise Questions Over Pune University Exam System After DTL Paper Row
sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार आणि पेपर काढणाऱ्या प्राध्यापकांची बौद्धिक दिवाळखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ (डीटीएल) अभ्यासक्रमाचा १०० गुणांचा पेपर चक्क एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसाच्या तसा ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा प्रताप समोर आला आहे.