Viral Video when a Gujarati youth was surrounded and forced to fold hands and apologize after refusing to speak Marathi during a parking dispute.
esakal
पुणे
Pune Video : पुण्यात भाषेवरून राडा! “मराठी बोलणार नाही" म्हणणाऱ्या गुजराती तरुणाला हात जोडून मागायला लावली माफी, व्हिडिओ व्हायरल
पुण्यात मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या तरुणाला हात जोडून माफी मागायला लावल्याचा एक व्हिडिओ सध्या तेजीने व्हायरल होतोय
Pune Viral Video : सोशल मीडियावर रोजच कोणता ना कोणता भाषा वादचा व्हिडिओ व्हायरल होतो. कधी मराठीसाठी मारामारी, कधी हिंदीसाठी राडा...आता यात पुण्यातून एक नवाच व्हिडिओ समोर आला आहे. यात एक गुजराती तरुण पार्किंगवाल्याशी भांडण काढतो आणि थेट “मी मराठी बोलणार नाही, मी गुजराती आहे” असं जाहीरपणे सांगतो. बस्...यानंतर जे घडलं ते पाहून अनेकांचा पारा चढला

