पुण्याच्या वेशीवर उपासमारीचे संकट; आधीच सरकारी धान्य मिळेना त्यात पैशाचीही चणचण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

'कोरोना' लाॅकडाऊन मुळे शहरातील कामधंदा जसा बंद झाला आहे तसाच ग्रामीण भागात ही मजुरीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पोपटराव चोरगे म्हणाले, "शेतात काम करून आमचे घर भागत होते, पण आता सगळे काम बंद झाले, जवळ पैसा देखील नाही. सरकारने धान्य मोफत देणार म्हणून घोषणा केली पण अजून गावात काहीच आलेले नाही. सरकारने अन्नधान्य मिळण्यासाठी लवकर काही तरी केले पाहिजे."

पुणे : घराच पाच माणसे.... शेतातली मजूरी बंद झाली...पैसा ही संपत आला...घरात अवघे काही दिवस पुरेल एवढेच धान्य...सरकारकडून लवकर मदत मिळावी पाहिजे...ही अवस्था आहे पोपटराव चोरगे यांच्या घरातील. हे चित्र महाराष्ट्रातील कोणत्या दुष्काळी भागातले नाही तर पुण्याच्या वेशी वरील कोंढाणपूर या खेड्यातील आहे. या ठिकाणी अद्याप शासनाने घोषीत केलेल्या योजनांचे धान्य पोहोचलेले नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना' लाॅकडाऊन मुळे शहरातील कामधंदा जसा बंद झाला आहे तसाच ग्रामीण भागात ही मजुरीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पोपटराव चोरगे म्हणाले, "शेतात काम करून आमचे घर भागत होते, पण आता सगळे काम बंद झाले, जवळ पैसा देखील नाही. सरकारने धान्य मोफत देणार म्हणून घोषणा केली पण अजून गावात काहीच आलेले नाही. सरकारने अन्नधान्य मिळण्यासाठी लवकर काही तरी केले पाहिजे."

Coronavirus : स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

चोरगे यांच्या प्रमाणे त्यांच्या गावात किमान ४० कुटुंब आहे. खडकवासला, खामगाव, वैदुवाडी, घोटकुलेवाडी, सोमाटणे  फाटा, थेरगाव, बेलवाडे, बहुली या गावात अशीच अवस्था आहे. शासनाची धान्य वितरण व्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो आहे. पुणे शहराच्या हद्दीपासून काही अतंरावरील गावांमध्ये, वस्तींवर नागरिकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत आहे. गावातील किराणा दुकानेही माल नसल्याने बंद झाली आहेत. तर काही ठिकाणी दुकानेच नाहीत. यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडे अन्नधान्याच्या किटची मोठी मागणी होत आहे. 

Coronavirus: कोरोनाबाधित वाढताहेत, घराबाहेर पडू नका

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी म्हणाले, "आम्ही आतापर्यंत १० गावांमध्ये सुमारे चार हजार अन्नधान्याचे किट वाटप केले आहे. लोकांकडे पैसा नसल्याने व धान्य संपल्याने रोज ही मागणी वाढत आहे. प्रत्यक्षात घटनास्थळी गेल्यावर गरजवंतांची संख्या जास्त असल्याचे समोर येत आहे. शासनाकडून धान्य वाटप होते की नाही अशीच अवस्था आहे, पण आम्ही कमी न पडता सर्वांपर्यंत मदत देत आहोत."

बारामतीत दोन लहान मुलींना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांची संख्या...​

आदिवासी पाड्यांवरील अवस्था वाईट
खडकवासला, पौड भागातील दुर्गम डोंगरातील आदिवासी मिळेल ते काम करून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. रोज सामान आणून दिवस काढत  होते. मात्र आता त्यांनी अवस्था वाईट झाली आहे. घरात धान्य साठविण्याची सोय देखील नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Will have to face Hunger crisis without Money and not getting grains by government