पुणे : रोडमॅप नसल्यास 'पीएमपी'ला भरावा लागणार दंड!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती.

पुणे : बस कोणत्या मार्गावरून कोठे जाणार आहे, याची योग्य माहिती देणारा मार्गफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मार्गफलक नसल्यास वाहक आणि चालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामंडळातील अधिकाऱ्यांनी नुकताच मार्गांवरील बसचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक बसना मार्गफलक नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, कागदी फलक चिकटवणे, फलक न बदलणे, मार्ग क्रमांकात खाडाखोड, फलकाला विद्युतव्यवस्था नसणे, फलक अस्पष्ट असणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

- पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...

मार्गफलकाबाबत चालक व वाहक काणाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई केली जात होती. भाडेतत्त्वावरील बसला एक हजार, तर पीएमपी बसच्या वाहक व चालकाला प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावला जात होता.

- महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

मात्र, काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा ही कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- विदेशातील कांदा विकू देणार नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitiative action if PMP bus does not have roadmap