
परिंचे / सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील मांढर येथील कोरोना पॉझिटिव्ह ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर आज पुन्हा धक्कादायक बाब पुढे आली आहे. या मृत रुग्णाचा भावाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णाच्या थेट संपर्कातील व कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या 21 जणांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
मांढरचा 85 वर्षीय मृत रुग्ण गावातील पुजारी होता. त्याने मुंबईत कोरोनाधित मृताच्या आणलेल्या अस्थीचे नातेवाईकांच्या उपस्थितीत क्रियाकर्म केले होते. या पुजारी रुग्णाचाही मृतदेह मांढरला नेऊन ग्रामस्थांनीही अंत्यसंस्कार केले. त्याचा 63 वयाचा भाऊ सासवड कोविड केअर सेंटरमध्ये असताना त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. मात्र, त्यास उपचारार्थ पुण्यात हलविल्यानंतर आज त्याचाही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मांढर प्रकरण धाकधूक वाढवून त्रासदायक ठरत आहे.
मांढर येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची हायरिक्स व लोरिस्क यादी बनवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात अनेक लोक आले असल्याची भीती सरपंच सचिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून मांढर गावासह आठ वाड्या-वस्त्या तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या गावातील ३३ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मांढरमध्ये आरोग्य पथकाबरोबरच तहसीलदार रूपाली सरनोबत, पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे, मंडल अधिकारी सोमनाथ वांजळे, वैद्यकीय अधिकारी गणेश पवार, तलाठी नीलेश अवसरमोल, ग्रामसेवक शशांक सावंत आदी उपस्थित असून पुढील उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजण व जवळार्जुन येथील सात व्यक्तींचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. दरम्यान रुग्ण संख्या आठवरवर व नवीन संपर्कातील लोक वाढल्याने डोकेदुखी कमी होत नाही. त्यामुळे कोरोनामुक्त पुरंदर होणे अजून दूरवरच चालले आहे. तरीही मांढर रुग्णाच्या मृत्यूने; मांढरच्याच आणखी एका सशंयिताच्या मृत्यूने आणि मृताचा भाऊ पॉझिटिव्ह निघाल्याने मांढर गाव पुरते सीलबंद होऊन प्रशासनाची काळजी वाढली आहे. एकुणच मुंबई व पुणे कनेक्शनमधून धाकधूक सतावतेय.
तालुक्यातील जवळार्जुन येथील थेट संपर्कामधील 8 पैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मांढर येथील 21 थेट संपर्कातील लोकांना सासवड येथे ट्रिपल कोविड केअर सेन्टरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुपे, सासवड, जवळार्जुनसह कोडीतचे रुग्ण बरे झाल्याचा अहवाल नाही.
वीर गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजण तपासणीत निगेटिव्ह आले आहे. त्यांना 'होम क्वारंटाइन' होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडण्यात आले. सुपे येथील रुग्णाच्या थेट संपर्कातील 17 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुरंदरकरांना बर्यापैकी हा थोडा दिलासा आहे. जेजुरीपाठोपाठ वीरचा पोलिस रुग्ण बरा झाला. कोडीतचे रुग्ण संपर्कातील पाचपैकी चार निगेटिव्ह आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.