Rain News: ओतूर परिसरात शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका तर डिंगोरेत घरावर विज कोसळली

सुदैवाने जीवित हानी नाही.
Rain News otur
Rain News otur sakal

Farming: ओतूर ता.जुन्नर व परीसरातील गावामध्ये रविवारी रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साठून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर डिंगोरे येथे अवकाळी पाऊस सुरू असताना रात्री घरावर विज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

ओतूर,उदापूर,डिंगोरे,नेतवड,माळवाडी,बल्लाळवाडी,पिंपळगाव, जोगा, कोळवाडी,वाटखळे,सितेवाडी,मढ,पारगाव,खूबी,करंजाळे,खिरेश्वर,सांगनोरे,कोपरे, मांडवे,मुथाळणे चिल्हेवाडी,आंबेगव्हाण,रोहोकडी व परीसरातील गावामध्ये काही ठिकाणी रविवारी दुपारी तर काही भागात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीजासह ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा वाहत अवकाळी पाऊस झाला.

Rain News otur
Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत : पालकमंत्री भुसे

या अवकाळी पावसामुळे शेतात नुकत्याच लागवड केलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठून कांदा रोप मरीचे प्रमाणात वाढणार आहे.तर ज्या शेतकऱ्यांनी दिवाळी आधी आगाप लाल कांदे लावले आहे, त्याच्या कांद्याच्या फुगवणी कमी होऊन उत्पादन घटणार आहे.तर अवकाळी पावसामुळे कित्येक पशुपालक शेतकऱ्यांनी शेतात केलेले चारा पिक भुई सपाट झाले.

Rain News otur
Jalgaon Unseasonal Rain : आज जोरदार पावसाचा अंदाज; जिल्ह्यात ढगाळ वातावरण

हा अवकाळी पाऊस झाल्या नंतर सोमवारी ही हवामान ढगाळ असून काही भागात पाऊस ही पडत आहे.त्यामूळे या खराब व रोगात हवामानाच पिकावर मर रोगा बरोबर,मावा,भुरी,करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे.एकूण अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

डिंगोरे गावातील दत्तवाडी येथील राजेंद्र महादेव लोहोटे यांच्या घरावर अवकाळी पावसात रात्रीच्या वेळी विज पडली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घरावर वीज पडल्याने घराच्या वरील काही पडला आहे.

Rain News otur
Nandurbar Unseasonal Rain : पावसाच्या शिडकाव्याने जिल्हा गारठला; कापसाला फटका बसण्याची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com