राज ठाकरेंनी 'यांना' दिली थेट पक्षात येण्याची ऑफर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

माझ्याविषयी सांगायचे झाल्यास मला राजकीय व्यंगचित्र शिकायचे होते. त्यामुळे मी मधूनच शिक्षण सोडले आणि जे जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये व्यंगचित्र शिकलो. त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकाराची डिग्री नाही आणि मला कोणीही डिग्री बद्दल आता पर्यंत विचारले नाही.'' अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यक्रमा प्रसंगी मांडली. ​

पुणे : झील इन्स्टिट्यूट्स आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विधार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याच्या 'इंक अलाइव्ह' या कार्यशाळेचे उदघाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, व्यंगचित्रकार चारूहास पंडित, जयेश काटकर तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपिठावरील व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?
 

''राज्य सरकार जेव्हा चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकते, तेव्हा अशा संस्था उभा राहायला पाहिजे. यामुळे विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे. तर, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी कला असते. ती चित्रकलाच असली पाहिजे असे नाही, ती कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यामुळे शिक्षणाला डिग्री लागते. पण, कलेला कोणत्याही प्रकाराची डिग्री लागत नाही.
 
पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

माझ्याविषयी सांगायचे झाल्यास मला राजकीय व्यंगचित्र शिकायचे होते. त्यामुळे मी मधूनच शिक्षण सोडले आणि जे जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये व्यंगचित्र शिकलो. त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकाराची डिग्री नाही आणि मला कोणीही डिग्री बद्दल आता पर्यंत विचारले नाही.'' अशी भूमिका राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यक्रमा प्रसंगी मांडली. तसेच चित्रकलेला मरण नसून त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थीमधील कला हेरली पाहिजे. त्यांच्या मधील कला वाढविण्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

यावेळी भाषण सुरू असताना व्यासपीठावर असलेले व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांच्याकडे पाहत, राज ठाकरे म्हणाले, येतो का पक्षात? असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray directly give offers to cartoonist Sanjay Misri to come in the party