तळेगाव ढमढेरे येथील महिलांनी 'एक धागा जवानांसाठी' हा उपक्रम राबविला

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील महिलांनी जवानांसाठी राख्या पाठविल्या.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील महिलांनी जवानांसाठी राख्या पाठविल्या.

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महिलांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सुमारे ८५० जवानांसाठी राख्या पाठवून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील महिला मंडळांनी 'एक धागा जवानांसाठी' हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे विधायक कर्तव्य रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने केले आहे. लडाख येथील सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी राख्या पाठवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे अनेक सैनिकांना यावर्षी आपल्या बहिणीची राखी बांधली जाणार नाही त्यामुळे विठ्ठलवाडी येथील सेवानिवृत्त कॅप्टन लोभाजी अल्हाट यांच्या प्रेरणेने एक धागा जवानांसाठी हा उपक्रम यावर्षी तळेगाव ढमढेरे  येथील श्री संत सेना महाराज मंदिरात राबविण्यात आला.

पुणे : ...म्हणून ट्राफिक पोलिसालाच बसला ५ हजार रुपये दंड!​ 
 
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, रतन बोराटे, उज्वला कर्हेकर, सुवर्णा भुजबळ, अलका शित्रे, शैला भुकणे, सुनिता सादिगले, शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष पी. बी. जगताप, श्री संत सेना महाराज नाभिक संघटनेचे गोरक्षनाथ कर्हेकर, शेतकरी घनश्याम तोडकर व ग्रामस्थ  उपस्थित होते. 

या उपक्रमासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना राख्या संकलन करण्याचे आवाहन केल्याबरोबर उत्तम प्रतिसाद देत अल्पावधीत  महिलांनी तब्बल ८५० राख्या संकलित केल्या. या सर्व राख्या लडाख येथील सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी स्पीड पोस्टाने रवाना करण्यात आल्या. या विधायक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com