esakal | रेशन कार्डधारकांना दिलासा! 15 एप्रिलनंतर पाच किलो तांदूळ मिळणार मोफत

बोलून बातमी शोधा

Ration card holders will get five kilos of rice free after April 15

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य आणि डाळी मिळतील, अशी घोषणा केली. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोफत धान्य वाटप करण्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. तसेच, अन्नधान्य वितरण विभागाने मे आणि जून महिन्याचे धान्य 10 एप्रिलनंतर देण्यात येईल, असे काल जाहीर केले होते.

रेशन कार्डधारकांना दिलासा! 15 एप्रिलनंतर पाच किलो तांदूळ मिळणार मोफत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : रेशन दुकानावर कार्डधारकांना एप्रिल महिन्याचे धान्य नियमित दरानुसार विक्री करण्यात येत आहे. परंतु या महिन्याचे मोफत धान्य 15 एप्रिलनंतर देण्यात येणार असून, त्यामध्ये कार्डधारकांना पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येईल. अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच हे धान्य उपलब्ध होणार आहे.

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत... 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना तीन महिन्यांचे मोफत धान्य आणि डाळी मिळतील, अशी घोषणा केली. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोफत धान्य वाटप करण्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. तसेच, अन्नधान्य वितरण विभागाने मे आणि जून महिन्याचे धान्य 10 एप्रिलनंतर देण्यात येईल, असे काल जाहीर केले होते.


- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!

या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, रेशन दुकानदारांनी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य खरेदीसाठी पैसे भरले आहेत. परंतु तीन महिन्यांचा धान्याचा साठा करण्यास रेशन दुकानदारांकडे पुरेशी जागा नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या मागणीनुसार एप्रिल महिन्याचे धान्य रेशन दुकानदारांना देण्यात आले आहे. त्यानुसार आज एक एप्रिलपासून गहू आणि तांदूळ वितरित करण्यात येत आहे. या धान्याची विक्री येत्या दहा-बारा दिवसांत होईल. त्यानंतर 15 एप्रिलपासून कार्डधारकांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच मे आणि जून महिन्यातही नियमित गहू आणि तांदूळ दिल्यानंतर मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. ज्या रेशन दुकानदारांनी नियमित गहू आणि तांदूळ खरेदी केला आहे, त्यांनाच कार्डधारकांना वितरित करण्यासाठी अतिरिक्त मोफत तांदूळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच, नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी, प्रशासनाने शासकीय धान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू त्यात डाळ, साखर, साबण आणि मीठ विक्री करण्याची मुभा रेशन दुकानदारांना दिली आहे. याबाबतचा निर्णय दुकानदारांनी घ्यायचा आहे, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!रेशन दुकानांमध्ये डाळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. याबाबत अद्याप सरकारच्या कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे कार्डधारक लाभार्थ्यांना सध्यातरी डाळ उपलब्ध होणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.


पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर कडक देखरेख 

रेशन दुकानांमध्ये केवळ गहू आणि तांदूळ उपलब्ध असून, अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. गहू दोन रुपये किलो आणि तांदूळ तीन रुपये किलो असा दर आहे. याव्यतिरिक्त पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय सरकारच्या सूचना प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे अन्नधान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले.


Coronavirus : कर्मचारी घटल्याने डॉक्टरांच्या अडचणीत भर​

रेशन कार्डधारकांसाठी हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1077 
मोबाईल क्रमांक 9405163924


रेशन दुकानदारांनी तीन महिन्याचे धान्य खरेदीसाठी पुरवठा विभागाकडे चलन भरले आहे. परंतु तीन महिन्यांचा धान्याचा साठा दुकानांमध्ये ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे कार्डधारकांना तीन महिन्याचे धान्य टप्प्या टप्प्याने द्यावे.
- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर.


किराणा हवा आहे... फक्त क्लिक करा ! 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत. या केंद्रावरुन फूड पॅकेट थाळी 5 रुपये या दराने विक्री सुरु आहे. केंद्रचालकांना फूड पॅकेटव्दारे थाळी विक्री करण्‍यास परवानगी दिली असून गरीब, गरजू व्यक्तींच्या ठिकाणी जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा देण्यात आली असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.