arrest
arrest

बऱ्हाटेच्या साथीदाराला अटक; जीवे मारण्याची धमकी देत बळकावला होता बंगला

पुणे - व्यावसायिक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा बंगला बळकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या आणखी एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधीत प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये यापुर्वी पाच जणांना अटक केलेली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश मधुकर आमंदे (वय 45) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी विनोद ढोरे, सुजीत सिंग, शैलेश जगताप, विठ्ठल रेड्डी, नितीन पवार यांना अटक केले होते. विशाल ढोरे व त्याच्या बारा साथीदारांनी एका व्यावसायिकाचा बंगला हडप करण्याच्या उद्देशाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने सह्या घेऊन बनावट दस्त बनविले होते.

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनीयम, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर संबंधीत प्रकरणात गुन्ह्यातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून स्वतः टोळीप्रमुख बनून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार 10 ऑक्‍टोबरला संबंधीत प्रकरणात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता. 

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी गणेश आमंदे हा टिळक रस्ता परिसरात आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलिस कर्मचारी मोहसीन शेख यांच्या पथकाने आमंदे यास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो संबंधीत गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अटक केली. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com