

Another Aircraft Incident in Baramati; Locals Witness Dramatic Crash Scene
esakal
-विजय मोरे
उंडवडी : गोजुबावी (ता. बारामती) हद्दीत जाधव-आटोळेवस्ती परिसरात पाझर तलावालगत आज सकाळी साडेआठच्या सुमारास ‘रेड बर्ड’ कंपनीचे शिकाऊ विमान शेतात कोसळल्याची घटना घडली. त्या वेळी संबंधित शेतात महिला काम करत होत्या. सुदैवाने विमान लोकवस्तीत न पडता शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.