कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने मास्क, सॅनिटाझरला पुन्हा मागणी

Sanitiser-Mask
Sanitiser-Mask

पुणे - कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरात मास्क आणि सॅनिटाझरच्या मागणीतही वाढ झाली. गेल्या दोन महिन्यांपासून ही मागणी कमी झाली होती. पण, या दोन दिवसांमध्ये पुणेकर पुन्हा मास्क खरेदीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा थेट परिणाम पुन्हा मास्कची मागणी वाढण्यावर झाला, असे निरीक्षण औषध बाजारपेठेतील विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना नोंदविले. शहरात सप्टेंबरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्या वेळी मास्क, सॅनिटाझर, सोशल डिस्टन्सिंग याचा काटेकोर वापर पुणेकर करत होते. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीपर्यंत कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे कोरोनाची भीती गेली. पाठोपाठ मास्क वापरणे कमी झाले. त्यामुळे जिथे एक हजार मास्कची विक्री होत होती. ती जानेवारीमध्ये १०० पर्यंत कमी झाली, असे विक्रेत्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या रुग्णसंख्येने बुधवारी शहरात सातशेचा आकडा ओलांडला. त्यामुळे मास्क खरेदीकडे पुणेकरांनी मोर्चा वळविला. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये ही मागणी वाढत आहे. कॉटन मास्क, एन ९५ आणि सर्जिकल मास्क अशा प्रकारात मास्क आहेत. त्यापैकी एन ९५ला मागणी आहे.

मास्क आणि सॅनिटाझरचा शहरातील पुरवठा व्यवस्थित आहे. त्यामुळे मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क सहज मिळू शकतात. त्याचे दरही नियंत्रित असल्याने ग्राहकांना परवडेल अशा दरात त्याची विक्री होत आहे.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट

मास्क आणि सॅनिटाझर यांची मागणी वाढली. याआधी ही मागणी अगदीच कमी झाली होती. मात्र, रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सॅनिटाझरपेक्षाही मास्कची मागणी वाढली.
- रोहित करपे, औषध विक्रेते

डिस्पोजेबल मास्कची मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात आता दहा ते पंधरा हजारांची विक्री होत आहे. डिस्पोजेबल मास्कच्या तुलनेत एन ९५ मास्कला मागणी जास्त आहे. या मास्कची एमआरपी १२ रुपये ९० पैसे आहे. याच मास्कची गेल्या वर्षी दोनशे ते अडीचशे रुपयांना विक्री होत होती.
- अनुप गुजर 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com