बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास; चंद्रकांत पाटलांच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil said, Redevelopment of Balgandharva Natyagruha

बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास; चंद्रकांत पाटलांच्या सूचना

पुणे : पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणे आवश्यक आहे. त्यामध्येच बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकासही (Redevelopment) गरजेचा आहे.‌ परंतु, महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील विरोधाचे कारण लक्षात घेऊन खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरुवारी (ता. १९) केली. (Chandrakant Patil said, Redevelopment of Balgandharva Natyagruha)

चंद्रकांत पाटील यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. शहराचा विकास देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांना उत्तम सुविधा पुरविणे ही काळाची गरज आहे.‌ त्यासाठी नदीसुधार प्रकल्प असो किंवा बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास! वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने हे दोन्ही प्रकल्प साकारणे आवश्यक आहेत, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

बालगंधर्व नाट्यगृहाचा (Balgandharva Natyagruha) पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. कारण, पुनर्विकासात नाट्य संस्कृतीच्या जोपासनेसह नव्या पिढीमध्ये मराठी नाट्य क्षेत्राबद्दल ओढ निर्माण व्हावी यासाठीचे सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच याचा पुनर्विकास होताना जागेचा व्यवसायिक कारणांसाठी वापर होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पाटील म्हणाले.

हे रंगमंदिर भविष्यात जागतिक दर्जाचे होईल

नव्या नाट्यगृहाच्या (Balgandharva Natyagruha) पुनर्विकासात एक हजार, पाचशे आणि तीनशे आसन क्षमतेचे रंगमंच उभारण्यात येणार असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध होईल. त्यासोबतच नाट्यप्रेमींनाही नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे सादरीकरण पाहिल्यानंतर हे रंगमंदिर भविष्यात जागतिक दर्जाचे होईल, असा मला चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.

खासगी नाट्यगृहे नाट्यरसिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा

सध्या पुनर्विकासासाठी (Redevelopment) जो विरोध होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना नाट्यगृहापासून वंचित रहावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा. किमान पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यल्प दरात महापालिकेसह खासगी नाट्यगृहे नाट्यरसिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली.