पुरंदरमधील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 24 जणांचा अहवाल...

corona
corona

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील वीर गावातील कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजण तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. त्यांना घरी 'होम क्वारंटाइन' होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडण्यात आले आहे. तसेच, सुपे येथील रुग्णाच्या थेट संपर्कातील 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुरंदरकरांना बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे. 

पुरंदर तालुक्यातील कोडीत, जवळार्जुन व सासवडमधील रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे रिपोर्ट बाकी आहेत. वीरचे सातजण घरी सोडल्यानंतर सुपे येथील संपर्कातील 17 निगेटिव्ह घरी सोडले जातील. त्यांनी घरीच क्वारंटाइन करायचे आहे. कोडीत गावातील रुग्णाच्या संपर्कातील पाचजणांचे आज नमुने घेण्यात आले. सासवडमधील पाॅझीटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजणांचे नमुने उद्या घेतले जातील. त्यामुळे ते सारे सासवड कोविड केअर सेंटरला आहेत.  

तहसीलदार रुपाली सरनौबत या रोज आढावा घेत आहेत. तसेच, जवळार्जुनसह या पाचही गावातील बाधिताच्या न कळत संपर्कातील होम क्वारंटाइन सुमारे दोनशेहून अधिक आहेत. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले तर शाळांमधील क्वारंटाइन हजारो आहेत. त्यातून प्रत्येक गावात धाकधूक आहे. त्यावर प्रशासनाची नजर आहे. त्यांनी बाहेर न फिरण्याचे सक्त आदेश आहेत. 

लाॅकडाऊन असला तरी बरीच बंधने शिथिल झाली. सवलतींमुळे नोकरदार पुण्यात जाऊ व येऊ लागले. अशा मंडळींनी कामावरून आल्यावर होम क्वारंटाइन व्हायचे असते, पण थोडा अपवाद वगळता बाकी शेकडो लोक नियम पाळत नाहीत.  त्यांना आवरण्यासाठी दवंडी देऊनही उपयोग होईना. त्यामुळे पुणे कनेक्शनधून तीन रुग्ण व शेकडो लोक क्वारंटाइन आहेत. मुंबईकर तर इतके आलेत आणि रोज शेकडो येतच आहेत. त्यांच्यातून आजही धाकधूक गावागावात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com