कोचिंग क्लासेससाठी सरकारला साकडे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १४ महिन्यांपासून राज्यातील कोचिंग क्लासेस बंद ठेवले आहेत.
Coaching Class
Coaching ClassSakal

पुणे - कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे १४ महिन्यांपासून राज्यातील कोचिंग क्लासेस (Coaching Class) बंद ठेवले आहेत. यामुळे अनेक क्लासेस चालकांना आर्थिक अडचणी, (Economic Problem) तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक (Student Education) नुकसान (Loss) होत आहे. त्यामुळे येत्या २१ जूनपासून राज्यातील सर्व क्लासेस ऑफलाइन पद्धतीने (Offline Process) सुरू करत असून, त्यासाठी शासनाने परवानगी (Permission) द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समितीने पत्रकार परिषदेत केली आहे. (Request to Government for Coaching Classes)

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पवार, असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ओनर्स अँड मेंटॉर्सचे अध्यक्ष दिलीप मेहेंदळे, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. रजनीकांत बोंद्रे आदी या वेळी उपस्थित होते.

Coaching Class
डीएसके प्रकरण : शिरीष कुलकर्णी यांचा जामीनासाठी अर्ज

पवार म्हणाले, ‘ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होत नाही. शहरातील काही गरीब कुटुंब व ग्रामीण भागात आजही कित्येक मुलांकडे पुरेशी सुविधा नसल्याने ऑनलाइन शिक्षण मिळत नाही. त्यामुळे क्लासेसच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करता येतील.’

मेहेंदळे म्हणाले, ‘राज्यात एक लाखाहून अधिक नोंदणीकृत खासगी कोचिंग क्लासेस आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे २० लाख लोकांना उत्पन्न मिळते. यात क्लास संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रदीर्घ लॉकडाउनमुळे उत्पन्न पूर्ण थांबले आहे. त्यामुळे क्लासेस चालकांना भाडे, इतर कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च, वीज बिल आदी सर्व खर्च कसे भागवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शाळा व महाविद्यालयातील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.’

Coaching Class
मांजरी रेल्वे फाटक 18 जूनपासून बंद

क्लासेस बंद असल्यामुळे नीट, जेईई, एमपीएससी, यूपीएससीसारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करताना अडचणी येत आहेत. यासाठी प्रशासनाने २५ किंवा ५० टक्के क्षमतेने ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. कोचिंग क्लासेस कोरोनाची सर्व खबरदारी घेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे सुरू करतील, तसेच क्लासेसच्या शुल्कामध्ये काही सवलतही देऊ, त्यामुळे पालकांना आर्थिक ताण निर्माण होणार नाही.

- सतीश देशमुख, अध्यक्ष, सीसीपीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com