Return Monsoon Strong rain with thunder in Pune
Return Monsoon Strong rain with thunder in Pune

पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस;15 मिनिटाच्या पावसात रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे  : पुण्यात मध्यवर्ती पेठांसह संपुर्ण शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसामुळे शहरात सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते.

औंध, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण, बाणेर रोड, औंधरोड, सुतारवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडीत बालेवाडी, मार्केटयार्ड सहकारनगर, धनकवडी, पवती ,सातारा रस्ता, पद्मावती, अरण्येश्वर, संतनगर, संभाजी नगर, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, इ. भागात जोरदार पावसामुळे  रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात सोमवारपासून (ता. १९) ते गुरुवारपर्यंत (ता. २२) ‘यलो अलर्ट’ दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी (ता. २०) हा अलर्ट पुण्या-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिला आहे. अंदमानच्या समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत धुवाधार पाऊस पडला. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या अरबी समुद्रात आहे. तेथे त्याची तीव्रता कमी होत असून, पुढील २४ तासांमध्ये या क्षेत्राचा प्रभाव संपेल. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांमध्ये निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सोमवारपर्यंत (ता. १९) त्याची तीव्रता वाढणायाची शक्यता वर्तविण्यात आली असून त्यानंतर ते वायव्य दिशेला पूर्व किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोर्ट सोबत असु द्या.

सहकारनगर गजानन महाराज चौक कडून सारंग सोसायटी ,पद्मावती कडे जाणाऱ्या मार्गावर ओसंडून पाणी वाहत होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यामध्ये पाणी जाऊन गाड्या नादुरुस्त झाल्या तर जोरदार पाण्याच्या प्रवाहाने गाड्या पडल्या अशा घटना पंधरा मिनिटाच्या पावसात होत झाल्या. यामुळे या परिसरातील पावसाळी कामाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. 

यावेळी फारुख शेख (शाहू वसाहत)म्हणाले, ''लक्ष्मीनगर शाहू वसाहत येथे थोडासा जरी पाऊस झाला की शाहु वसाहत,आंबेडकर वसाहत मधील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. मनपा प्रशासन येऊन सेल्फी काढून भेट देतात तर नाले सफाई फक्त कागदावर असते. प्रत्यक्षात नाले सफाई होत नाही. येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. ''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com