जुन्नरच्या राजकीय क्षितिजावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उदय

दत्ता म्हसकर
शनिवार, 30 मे 2020

आंबे-पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रथमच झेंडा फडकवत जुन्नर तालुक्यात शिरकाव केला आहे

जुन्नर (पुणे) : आंबे-पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रथमच झेंडा फडकवत जुन्नर तालुक्यात शिरकाव केला आहे.

ज्येष्ठांनो काळजी करू नका; कोरोना रोखण्यासाठी तुम्हाला देणार 'हे' औषध!

आंबे-पिंपरवाडीच्या सरपंच दुलाजी धोंडू सावळे गुरुजी यांच्या मृत्युमुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. २९) मतदान झाले. या वेळी  मुकुंद पांडुरंग घोडे आणि गोविंद धावजी रेंगडे या सदस्यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. घोडे यांना रंजना घोडे, मीरा  डगळे व त्यांचे स्वत: अशी तीन मते मिळाली, तर  रेंगडे यांना भरत सावळे, लता किर्वे व त्यांचे स्वतः अशी तीन मते मिळाली. अलका  काठे या सदस्य तटस्थ राहिल्या. समसमान मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. लवांडे यांनी चिठ्या टाकल्या असता मुकुंद घोडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यामुळे त्यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

मुकुंद घोडे हे २४ वर्षाचे असून एम.ए. अर्थशास्त्र आहेत.  एस. एफ. आय या विद्यार्थी संघटना व पुरोगामी चळवळीत ते काम करीत आहेत. आंबे घाटातील रस्ता, आश्रमशाळा  या विषयावर आवाज उठवला आहे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थी मेळावे यांचे आयोजन केले.

वेल डन पुणेकर, तुम्ही कोरोनाला थोपवलंय; काळजी घ्यावीच लागणार! 

घोडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. रोजगारासाठी गावातील कोणीही गावाबाहेर जाणार नाही. येत्या १५ दिवसांत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीची कामे चालू केली जातील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rise of the Marxist Communist Party on Junnar's political horizon