esakal | पोलिसांच्या वेशात येऊन लुटले ज्वेलर्सचे दुकान
sakal

बोलून बातमी शोधा

nasrapur

भोर तालुक्यातील कापूरव्होळ येथे महामार्गावरील बालाजी ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानावर आज भरदिवसा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने चौकशीच्या बहाण्याने दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांची लूट केली. 

पोलिसांच्या वेशात येऊन लुटले ज्वेलर्सचे दुकान

sakal_logo
By
किरण भदे

नसरापूर (पुणे) : भोर तालुक्यातील कापूरव्होळ येथे महामार्गावरील बालाजी ज्वेलर्स या सोन्याचांदीच्या दुकानावर आज भरदिवसा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने चौकशीच्या बहाण्याने दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांची लूट केली. तसेच, या टोळक्याने परत जाताना दुकानावर गोळीबार करून दहशत निर्माण करत कारमधून पालयन केले आहे.

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

कापूरव्होळ येथील महामार्गालगत असलेल्या बालाजी काँम्प्लेक्स या इमारतीमधील संजय निकम (रा. कापूरव्होळ) यांच्या बालाजी ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास दोन जण पोलिस वेशात व तीन जण साध्या वेशात आले. त्यावेळी दुकानात मालक संजय निकम व त्यांचा धाकटा मुलगा होता. त्यांना पोलिस वेशातील व्यक्तींनी, आम्ही सोन्याची चोरी करणारे चोर पकडले असून, त्यांनी तुम्हाला चोरीचे सोने विकले असल्याचे सांगितले आहे, ते सोने कोठे आहे, ते आम्हाला दाखवा. त्यावेळी निकम यांनी आम्ही चोरांकडून काहीच सोने घेतले नसल्याचे सांगितले. त्यावर पोलिस वेशातील व्यक्तींनी निकम पितापुत्राला हाताने मारहाण करून बॅगमध्ये दुकानातील सोने भरण्यास सुरुवात केली व मोठ मोठे दागिने भरल्यावर दुकानातून बाहेर निघाले. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

त्यावेळी निकम यांनी चोर चोर, अशी ओरड केली. त्यावर परिसरातील नागरीक जमा होऊ लागले. त्यामुळे दरोडेखोरांमधील पोलिस वेशातील व्यक्तींनी गावठी कट्ट्यामधून ज्वेलर्स दुकान, शेजारील कपड्याचे दुकान व खालील मजल्यावरील मेडीकल स्टोअर्स या दुकानावर गोळीबार केला. एकूण सहा फैरी झाडल्याचे तेथील प्रत्यक्षदरर्शिंनी सांगितले. गोळीबार करतच त्यांनी स्विफ्ट कारमधून (क्रमांक एमएच 12 एफ के 2041) पोबारा केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ पोलिस कर्मचारयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने माहिती घेत पोलिस पथक दरोडेखोरांच्या मागावर पाठवले आहे. या दरोड्यात एकूण किती सोने गेले, याबाबत माहिती घेण्याचे व जाब जबाब नोंदवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत चालू होते. पोलिसांना दरोडेखोरांचा माग लागला असून, पोलिस पथक तपासासाठी पाठवण्यात आले असल्याची माहीती निरीक्षक विनायक वेताळ यांनी दिली आहे. 

loading image