रूम असलेले हॉटेल आणि लॉजमध्ये सध्या काय सुरू आहे पाहा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

-तयारी जोरात सुरू; ग्राहक येण्याची अपेक्षा
-रूम असलेले हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस उद्यापासून होणार सुरू

पुणे : प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस 33 टक्के क्षमतेत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर या हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस चालकांची शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे तयारीची लगबग सुरू होती. ग्राहकांनी त्यांची सेवा करण्याची संधी द्यायला हवी, अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिक ठेवून आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले राज्यभरातील हॉटेल, लॉजिंग आणि गेट हाऊस उद्या बुधवार (ता.8) पासून सुरु होणार आहेत. याबाबतचा अध्यादेश सोमवारी जारी करण्यात आला आहे. हॉटेल मालकांनी वेटर, कूक आणि व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावर येण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरक्षाविषयकची पूर्तता हॉटेल, लॉज, गेस्ट हाउसमध्ये करण्यात येत आहे. तर ज्या ठिकाणी आधीपासूनच पार्सल सुविधा सुरू होती, त्यांनी रूम सॅनिटाइझ करून ठेवले आहे. 

याबाबत हॉटेल 'परिचय'चे सुरजीत सिंग यांनी सांगितले की, हॉटेल आणि लॉजिंग सुरू करण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमानुसार सर्व तयारी केली आहे. ग्राहकांच्या प्रवासाची माहिती घेणे, त्याच्या तापमानाची तपासणी करणे आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर लगेच त्याचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. याबाबत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

तर काहीच उपयोग होणार नाही :
अपेक्षित ग्राहक आले तर व्यवसाय चालू शकतो. परवानगी आहे तेवढ्या सुविधा आम्हाला ग्राहकांना पुराव्या लागणार आहेत. त्यामुळे  परवानगी आहे तेवढ्या टक्क्यात ग्राहक येणे अपेक्षित आहे. ते जर आले नाही तर हॉटेल सुरू करून काहीच उपयोग होणार नाही. कारण त्यातून अपेक्षित व्यवसाय होणार नाही व दैनंदिन खर्च देखील भगणार नाही. हॉटेल व्यवसाय सुरळीत व्हायला डिसेंबर उजाडेल, अशी शक्यता सिंग यांनी व्यक्त केली.

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Room hotels, lodges and guest houses will be open from tomorrow

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: