esakal | नसरापूर येथे होणार ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूर येथे होणार ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर

नसरापूर येथे होणार ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर

sakal_logo
By
किरण भदे

नसरापूर : नसरापूर ता.भोर येथे महामार्गालगत आरोग्य केंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असुन या ठिकाणी ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर होत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी याला मंजुरी दिली असुन पुढील कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहीती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली आहे.

शिवतरे यांनी या बाबत माहीती देताना सांगितले की, नसरापूर येथील आरोग्य केंद्र अत्यंत अपुऱ्या जागेत आहे मोठ्या लोकसंख्येशी सलग्न असलेले हे आरोग्य केंद्र प्रशस्त जागेत व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा चालु होता. या आरोग्य केंद्रासाठी नसरापूर चेलाडी येथील पशुसंवर्धन विभागाची जागा जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे. त्या मुळे जागेचा प्रश्न सुटला असुन या नविन जागेत फक्त आरोग्य केंद्रा ऐवजी नसरापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मोठ्या लोकसंख्येसाठी तसेच महामार्गावर असल्याने अपघात ग्रस्तांसाठी देखिल तातडीने आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या 31 मे 2021 च्या सर्वसाधारण सभेत नसरापूर येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजुर व्हावे, असा ठराव करुन शासनास प्रस्ताव सादर करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती.

हेही वाचा: सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

तसेच जिल्हा नियोजन समितीच्या 16 जुलै 2021 च्या बैठकीत देखिल ऐनवेळच्या विषयात जिल्हा परिषदेच्या वतीने नसरापूर येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर व्हावे या केलेल्या मागणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सहमतीने मागणी मान्य करुन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निर्देश दिले आहेत.

रणजित शिवतरे यांनी या बाबत पाठपुरावा करत 24 आँगस्ट 2021 रोजी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन नसरापूर साठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर ची अत्यंत गरज असुन तशी मागणी शासनाकडे केली आहे,जिल्हा परिषदेचा ठराव व जिल्हा नियोजन समितीची मान्यता देखिल मिळाल्याचे सांगितले व या बाबत पुढील कार्यवाही व्हावी अशी विनंती केली असुन त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा करत आरोग्य व कुटुंबकल्याण सचिव यांना या बाबत कार्यवाही करण्याच्या सुचना तातडीने दिल्या असल्याची माहीती शिवतरे यांनी दिली.

हेही वाचा: राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर सडकून टीका

या मागणी बरोबरच भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिर्डोशी,भुतोंडे,उपकेंद्र रायरी,वेल्हे तालुक्यातील आरोग्य केंद्र पानशेत उपकेंद्र दापोडे या ठिकाणी आरोग्य केंद्र,उपकेंद्र इमारत बांधकाम पुर्ण झाले असुन त्या ठिकाणी कर्मचारयां अभावी प्रभावी सेवा देता येत नसुन या ठिकाणी अकृतीबंधा प्रमाणे तात्काळ कर्मचारी वर्ग मंजुर करण्यात यावा अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

loading image
go to top