

Sadabhau Khot Statement student
esakal
Sadabhau Khot Delhi Student Protest : दिल्लीत सुरू असलेल्या NEET पेपरफुटी आंदोलनावरून शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ भूमिका घेत आंदोलनावर टीका केली. आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करत त्यांनी काही शक्ती देशात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करत असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांसह काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे.