राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे

मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
Sadanand-More
Sadanand-More

पुणे : मराठी भाषा (Marathi Language) विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे (Sadanand More) यांची निवड केली आहे. मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. (Sadanand More selected as the Chairman of the State Board of Literature and Culture)

Sadanand-More
मॉन्सून 31 मे रोजी केरळात होणार दाखल, स्थिती अनुकूल - IMD

मंडळाची ही पुनर्रचना तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. मंडळात डॉ. प्रज्ञा दया पवार, अरूण शेवते, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, रंगनाथ पठारे, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, फ. मु. शिंदे, डॉ. रामचंद्र देखणे, निरजा, नवनाथ गोरे, डॉ. रणधीर शिंदे यांसह ३० साहित्यिक सदस्य म्हणून असणार आहेत.

Sadanand-More
अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी RBIनं चलन छपाई करावी - उदय कोटक

डॉ. मोरे म्हणाले,‘‘राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० मध्ये साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सुरवातीच्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ. सुरेंद्र बारलिंगे, डॉ. य. दि. फडके यांच्यासारख्या दिग्गजांनी मंडळाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. हा मान मिळत असल्याने विशेष आनंद आहे. राज्य सरकारने माझ्यावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. मंडळाची प्रशासकीय यंत्रणा खूप चांगली असल्याने लवकरच ऑनलाइन बैठक घेऊन पुढील चर्चा केली जाईल.’’

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उद्दिष्ट

  1. महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इतिहास संशोधनांचे प्रकल्प, योजना यांच्या पुर्ततेसाठी चालना देणे, स्वत: हाती घेणे

  2. राज्याचा इतिहास व संस्कृतीची महत्त्वाची प्रकाशित, अप्रकाशित संपादित, मराठीत भाषांतरित, प्रसिद्ध करणे

  3. राज्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचे संपादन व प्रकाशनास चालना देणे

  4. साहित्यविषयक संशोधन व साहित्याची अभिवृद्धी याबाबत सरकारी धोरण आखण्यास सरकारला मदत करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com