मॉन्सून 31 मे रोजी केरळात होणार दाखल, स्थिती अनुकूल - IMD

अंदमानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
IMD forecasts
IMD forecasts

पुणे : यंदा मॉन्सून वेळेत केरळमध्ये (Kerala) दाखल होणार असल्याचं भाकीत हवामान खात्यानं (IMD) आधीच वर्तवलं होतं. पण मधल्या काळात तौक्ते चक्रीवादळ (Taukte Cyclone) आणि नंतर आलेल्या यास चक्रीवादळामुळं (Yaas cyclone) मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण असा कोणताही परिणाम होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर मॉन्सून ३१ मे रोजीच केरळात दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. (Situation ok for Monsoon arrives in Kerala on May 31 IMD)

IMD forecasts
अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी RBIनं चलन छपाई करावी - उदय कोटक

मॉन्सूनने गुरुवारी (२७ मे) मालदीव-कोमोरीन क्षेत्राच्या आणखी काही भागांसह नैऋत्य आणि मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला, असल्याचंही हवामान खात्यानं कळवलं आहे. त्यामुळे मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे.

IMD forecasts
लस आयातीबाबत व्यवस्थित राष्ट्रीय धोरणं आखायला हवं - राजेश टोपे

अंदमानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

अंदमान-निकोबार बेटांवर ३० मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्यानं गुरुवारी दिला. एक किंवा दोन ठिकाणी सात ते ११ सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील सुचनेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असंही सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com