
Pune | पुण्यात उद्या हनुमान चालीसा लावणारच, मनसेचा इशारा
पुणे : मशिदींवरील भोंगे उतरवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी '३ मे' चा अल्टिमेटम दिला होता. जर भोंगे उतरवले गेले नाही तर उद्या बुधवारी चार मे पासून मशिदींसमोर जोऱ्यात हनुमान चालीसा लावला जाईला, अशा इशारा राज यांना दिला होता. मनसेचे (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हनुमान चालीसा लावणारच असे ट्विट करुन सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, पुण्यात (Pune) उद्या हनुमान चालीसा लावणारच तयारीत रहा. (Sainath Babar Warns Tomorrow Hanuman Chalisa Will Play In Pune)
हेही वाचा: ...त्यांना लांबूनच ईदच्या शुभेच्छा ! इम्तियाज जलील यांची राज ठाकरेंवर टीका
दुसरीकडे आज मंगळवारी (ता.तीन) मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. तसेच राज्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यास पोलिसांनी सुरु केले आहेत.
हेही वाचा: पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा; सरचिटणीस म्हणतात...
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर दाखल कलमांवरुन सरकारवर टीका केली.
Web Title: Sainath Babar Warns Tomorrow Hanuman Chalisa Will Play In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..