Sakal Natya Mahotsav : नाट्यरसिकांसाठी पर्वणी! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच 'या' दिवशी रंगणार सकाळ नाट्य महोत्सव; वेळापत्रक जाहीर

नाट्यरसिकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.
Sakal Natya Mahotsav
Sakal Natya Mahotsav esakal
Summary

प्रथमच नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ नाट्य महोत्सव’ (Sakal Natya Mahotsav) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात रंगणार आहे.

पिंपरी : ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त (Sakal Anniversary) प्रथमच नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ नाट्य महोत्सव’ (Sakal Natya Mahotsav) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात रंगणार आहे. शुक्रवारपासून (ता. २४) सुरू होणाऱ्या या महोत्सवाची तिकिटे खास सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

नाट्यरसिकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे, या महोत्सवातील दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

Sakal Natya Mahotsav
राज्यात धुमधडाक्यात हंगाम, पण शेट्टींच्या आंदोलनाची कारखानदारांना धास्ती; कोल्हापुरात फक्त 'इतकेच' कारखाने सुरू

येत्या २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दररोज रात्री ९.३० ते १२ या वेळेपर्यंत हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘जर तरची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ ही तीन नाटके सादर होणार आहेत.

वैविध्यपूर्ण विषयांवरील ही तीन दर्जेदार नाटके या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. प्रशांत दामले, कविता लाड, उमेश कामत, प्रिया बापट, संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे, अमृता देशमुख यांच्यासह मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ‘सेलिब्रिटीं’चा नाट्याविष्कार यानिमित्ताने सजणार आहे. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. साहजिकच ही एक वेगळी पर्वणी पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवता येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकिटे ‘बुक माय शो’ च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ८९७५२३७०४१ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आजपासून (रविवार) तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

Sakal Natya Mahotsav
जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

महोत्सवाची वैशिष्ट्ये

  • विविध विषयांवरील तीन दर्जेदार नाटकांचा समावेश

  • मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग

  • कधीही नाटक न पाहिलेल्या रसिकांना सामावून घेण्याचा विशेष प्रयत्न

  • दैनंदिन तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळावर उपलब्ध

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (तळमजला) - रुपये १०००

  • संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (बाल्कनी) - रुपये ८००

  • प्रतिनाटक तिकीट (तळमजला) - रुपये ४००

  • प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) - रुपये ३००

Sakal Natya Mahotsav
Mumbai : मुंबईचं जीवन डॉक्टरानं मोबाईलमध्ये केलं 'क्लिक'; वैद्यकीय सेवेतून वेळ काढत बक्षींनी जपला फोटोग्राफीचा छंद

महोत्सवाचे वेळापत्रक

  • शुक्रवार (ता. २४) : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’

  • शनिवार (ता. २५) : ‘जर तरची गोष्ट’

  • रविवार (ता. २६) : ‘नियम व अटी लागू’

  • फोन बुकिंग - ८९७५२३७०४१

  • संकेतस्थळ - ‘बुक माय शो’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com