Sakal Vastu Plotting Expo
Sakal Vastu Plotting ExpoSakal

Sakal Vastu Plotting Expo : पुणेकरांनी साकारले प्लॉटिंगचे स्वप्न! आज शेवटची संधी

पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या प्रशस्त व सर्व सुविधांयुक्त अशा प्लॉट वा जमिनीत गुंतवणूक करण्याच्या पुणेकरांच्या स्वप्नाची पूर्ती ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’मध्ये होत आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या प्रशस्त व सर्व सुविधांयुक्त अशा प्लॉट वा जमिनीत गुंतवणूक करण्याच्या पुणेकरांच्या स्वप्नाची पूर्ती ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’मध्ये होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोचे उद्‍घाटन शनिवारी झाले. या एक्स्पोला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वरद प्रॉपर्टी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महेश कुंटे, सुप्रिम रियालीटी ग्रुपचे संस्थापक-संचालक संतोष पवार, गंगोत्री होम अॅण्ड हॉलीडेजचे संस्थापक राजेंद्र आवटे, पंचम डेव्हलपर्सचे संचालक महेंद्र सुंदेचा, ट्रायडेंट ग्रुपचे संचालक भास्कर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून एक्स्पोचे उद्‍घाटन करण्यात आले.

चांगल्या परताव्याच्या उद्देशाने प्लॉट, जमिनीत गुंतवणूक करण्याच्या स्वप्नांची पूर्ती या एक्स्पोमध्ये होणार आहे. यासाठी आवश्यक ठरणाऱ्या सर्व बाबी एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्लॉटमधील गुंतवणूक अनेक संकल्पनांमुळे जास्त लाभदायक ठरत आहे. त्या अनुषंगाने आवड व बजेटनुसार २० हून अधिक विकसकांचे ५० हून अधिक प्लॉटिंग व जमिनीचे प्रकल्प या एक्स्पोमध्ये असतील. त्यातून ग्राहकांना प्लॉट खरेदीचे स्वप्न साकार करता येईल.

अनेक पुणेकरांचे स्वप्न आहे की, बंगला बांधण्यासाठी एनए प्लॉट किंवा शेतीसाठी जमीन घेऊन शेतकरी व्हावे, तेथे झाडे लावावीत. हे स्वप्न एक्स्पोच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. पुणे शहर सर्व दिशांनी वाढत आहे. त्यामुळे या सर्व परिसरात गुंतवणूक करण्यास आणि त्यातून चांगला फायदा होण्याला भरपूर संधी आहेत. जिल्ह्यातील एमआयडीसीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असून बांधकाम क्षेत्राचा चांगला विकास होत आहे.

- महेश कुंटे, संचालक, वरद प्रॉपर्टी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड

शहराच्या जवळ लहानशी का होईना आपली स्वतःची जमीन असावी, असे कोणाला वाटत नाही. मात्र कितीही इच्छा असली तरी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध असलेली जमीन शोधणे सोपे नाही. ‘सकाळ’च्या या एक्स्पोमुळे अनेकांची प्लॉट शोधण्याची अडचण दूर झाली आहे. या ठिकाणी प्लॉटिंगचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे प्लॉट निश्‍चित करणे सोपे झाले आहे.

- राजेंद्र आवटे, संस्थापक, गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज

आम्ही दरवेळी ‘सकाळ’च्या प्लॉट एक्स्पोमध्ये सहभाग नोंदवितो. कारण, या ठिकाणाहून मोठा प्रतिसाद मिळतो. लोक येथे येण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्लॉटिंगचे अनेक पर्याय एस्क्पोमध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे चांगला प्लॉट पाहण्यासाठी कुठेही फिरावे लागत नाही. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळत असल्याने दोन प्लॉटिंगची तुलना करता येते.

- महेंद्र सुंदेचा व प्रकाश बोरा, संचालक, पंचम डेव्हलपर्स

‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’शी आम्ही दीड वर्षापासून कनेक्ट आहोत. ग्राहकांना अपेक्षित असलेल्या प्लॉटची व्यवस्थित माहिती मिळावी, यासाठी एक्स्पोत चांगले नियोजन केले आहे. प्रदर्शनात येणारे पुणेकरदेखील त्यांना काय हवे हे ठरवून आलेले असतात व त्यानुसार खरेदी करतात. त्यामुळे एक्स्पोत सहभाग घेण्याचा अनुभव व्यवसायवृद्धीस फायदेशीर ठरत आहे.

- भास्कर पवार, संचालक, ट्रायडेंट ग्रुप

Sakal Vastu Plotting Expo
Pune Crime : मैत्रिणीला धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाणीत मृत्यू , दोघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

शहरालगतच्या निसर्गरम्य, इंद्रधनुषी, नयनरम्य, हिरव्यागार आणि अथांग निसर्गात आपल्या जीवलगांसह किंवा कुटुंबासह काहीसे निवांत क्षण घालवता येतील, असे क्षण कोणाला नको असतात. अशा सुखद स्वप्नांची स्वप्नपूर्ती ‘सकाळ’ने सहज उपलब्ध करून दिली आहे. एनए बंगलो, फार्महाउस प्लॉट्स, गुंठ्यांपासून एकरांपर्यंत शेतजमिनी, बंगलो प्लॉट्स, फार्मिंग प्रोजेक्ट्स विविध बजेट अन् लोकेशननुसार आणि तेही शहराच्या जवळ या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत.

- प्रिया संतोष पवार, मुख्य व्यवस्थापकीय संचालिका, सुप्रिम रियालिटी

एक्स्पोची मांडणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. याही एक्स्पोला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्लॉटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. प्रदर्शनाचे ठिकाण शहराच्या मध्यभागात असल्याने येथे होत असलेली गर्दी बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरेदीदारांच्या सर्व गरजा पूर्ण करतील, असे प्रकल्प आम्ही एक्स्पोमध्ये मांडले आहेत.

- नरेंद्र जैन, संस्थापक, अर्हम कॉर्पोरेशन

शहराजवळच्या विविध भागातील प्लॉटिंगचे अनेक पर्याय एक्स्पोत आहेत. त्यामुळे निवडीला वाव आहे. कोणत्याही व्यवसायिकांच्या स्टॉलला भेट दिल्यानंतर तेथे अत्यंत सोप्या भाषेत नेमकी माहिती मिळते. त्यामुळे तेथे गुंतवणूक केल्यास कसा फायदा होऊ शकतो हे समजते.

- सतीश गुरव, व्यावसायिक

अतिशय चांगले नियोजन आणि स्वच्छता हे एक्स्पोचे वैशिष्ट्ये आहेत. प्लॉटबाबत स्टॉलवर व्यवस्थित माहिती दिली जाते. त्यामुळे खरेदीचा निर्णय सोपा होतो. येथे अनेक चांगले प्रकल्प आहेत. त्यांची सर्वांची माहिती घेतली आहे. त्या सर्वांचा नीट अभ्यास करून नेमकी कुठे गुंतवणूक करायची, याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे.

- उदयराज काळे, नोकरदार

Sakal Vastu Plotting Expo
Mumbai-Pune Expressway : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावील अपघात घटले, महामार्गा पोलीस विभागाने दिली माहिती

अपेक्षित भागातील तीन प्लॉटिंगचे पर्याय मला एक्स्पोत पाहायला मिळाले. त्यातील दोन प्रकल्प खूप आवडले. त्यातील कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायची, हे मी ठरवणार आहे. ‘सकाळ’ने अतिशय चांगल्या पद्धतीने या एक्स्पोचे नियोजन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे प्रदर्शन भरविल्याने येथे जेणे-जाणे सोयीचे ठरले.

- अपूर्वा राऊत, नोकरदार

प्रदर्शनाविषयी....

कधी : रविवारी (ता. २५)

कोठे : सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

सुविधा : पार्किंग व प्रवेश मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com