अमोल कोल्हे यांचा गाडा सुसाट, पहिल्याच वर्षी असा पटकावला संसदरत्न पुरस्कार

amol kolhe
amol kolhe

मंचर (पुणे) : पहिल्या टर्मच्या पहिल्याच वर्षी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप फाईव्ह खासदारांमध्ये समावेश आणि आता जाहीर झालेला "संसदरत्न" पुरस्कार म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा दुहेरी सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझ्या मतदारांना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अर्पण करीत आहे, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


पुण्यातील परिवर्तन संस्थेच्या अभ्यास अहवालात 
तीनच दिवसांपूर्वी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप फाईव्ह खासदारांमध्ये डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत २०२ प्रश्न विचारुन दुसरा क्रमांक पटकावला होता. त्या पाठोपाठ लगेचच पहिलीच टर्म असूनही सतराव्या लोकसभेच्या पहिल्याच वर्षी 'संसदरत्न' पुरस्कार मिळाला, हा जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ केल्याचे प्रतीक आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. 

देशाचे, राज्याचे महत्त्वाचे विषय तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकभावना आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी बांधवांचे प्रश्न मांडण्याचा शब्द मी मतदारांना दिला होता. त्याची पूर्तता पहिल्याच वर्षी मिळालेल्या 'संसदरत्न' पुरस्काराने करता आली, हे माझे भाग्य समजतो असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

पक्षाध्यक्ष शरद पवारसाहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि लोकसभेतील आमच्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत कामकाजात भाग घेताना मतदारसंघातील बैलगाडा, शिवनेरी गड संवर्धन व जतन करणे, आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारणे, पुणे- नाशिक रेल्वे, रखडलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे त्याचप्रमाणे विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होताना केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांना पंतप्रधानांसह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी दिलेली दाद माझा उत्साह वाढवणारी असते, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com