Video : अश्‍विनी भिडेंच्या स्वरांचा निर्मळ गोडवा

सवाई संगीत महोत्सवात रसिकांनी दिलेली दाद प्रत्यक्ष कलाकारांनाही सुखावणारी असते. तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देताना रसिकश्रोते.
सवाई संगीत महोत्सवात रसिकांनी दिलेली दाद प्रत्यक्ष कलाकारांनाही सुखावणारी असते. तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देताना रसिकश्रोते.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात ओंकारनाथ हवालदार यांच्या अत्यंत आश्‍वासक गाण्याने झाली. त्यांनी राग मुलतानीचे नियम पाळत आणि त्याचबरोबर नवे विचार मांडत सादर केला. त्यांच्या आवाजाचा ‘टोन’ देखील गंभीर; परंतु मृदू होता. गाण्यात विचार आणि भाव या दोन्ही बाबींचा त्यांनी सुरेख समतोल राखला. ‘सवाई’सारख्या मंचावर कलाकाराला ‘क्रिएटिव्ह झोन’मध्ये जाणे फारसे सोपे नसते; परंतु ओंकारनाथ हवालदार यांनी ते साध्य केले हे विशेष.

‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग त्यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा एकत्र गुंफून सादर केला. हे करताना कुठेही स्वराला किंवा भावाला धक्का लागला नाही, हे फारच कौतुकास्पद आहे. 

स्वामी कृपाकरानंद यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘पटदीप’ या सायंकालीन रागाने केली. त्यांची तालीम जरी प्रामुख्याने पंडित जगदीश प्रसाद यांच्याकडे झाली असली, तरीदेखील त्यांच्या गायनात स्वतःचा विचार जाणवला.   

रीला होता आणि सहकलाकारांनी प्रस्तुत केलेले ओडिसी नृत्य कौशल्यपूर्ण होते. प्रेक्षक आणि मंचामधील अंतर फार असल्यामुळे तरल आणि सूक्ष्म हालचाली व हावभाव टिपणे थोडे कठीण जाते आणि प्रेक्षकांची गुंतवणूक थोडी कमी होते, हे जाणवले. विद्वान एल. सुब्रह्मण्यम यांचे व्हायोलिन वादन सफाईदार आणि चित्तवेधक होते. त्यांच्या वादनातील सफाई आणि विविध प्रकारच्या गमकांचा वापर वाखाणण्यासारखा होता.   

विदूषी अश्‍विनी भिडे-देशपांडे यांचे गायन म्हणजे या वर्षीच्या महोत्सवातील आतापर्यंतचा सर्वोत्तम सांगीतिक आविष्कार असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी मांडलेला राग खेम कल्याण संगीताच्या सर्वच निकषांवर सरस ठरला. 
हंसध्वनी आणि कल्याण या दोन रागांना एकत्र गुंफून निर्मिलेला हा राग सुंदर स्वर रचनांनी आणि निकोप स्वरांच्या साह्याने त्यांनी फार छान खुलवला. त्यांच्या गायनातील प्रत्येक स्वर सुंदर होताच, परंतु रागाचा तयार झालेला आकृतिबंध देखील तितकाच प्रभावशाली होता. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी केलेली संवादिनी साथ देखील तितक्‍याच तयारीची आणि संगीतिकदृष्ट्या उमदी होती. तानांची रचना आणि त्या सादर करण्यातली सफाई कानांत साठवण्यासारखी होती. खेम कल्याण नंतर सादर केलेला राग नायकी कानडा आणि दादरा देखील छान रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com