Leopard : उंब्रज येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद

उंब्रज(ता.जुन्नर) येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दुसरा बिबट्या शनिवारी(ता.१६) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
Second leopard trapped in cage set by forest department in Umbraj
Second leopard trapped in cage set by forest department in UmbrajSakal

पिंपळवंडी : उंब्रज(ता.जुन्नर) येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दुसरा बिबट्या शनिवारी(ता.१६) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.काल शुक्रवारी(१५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला वनविभागाने पकडले होते.

सदर बिबट ८ वर्षीय मादी असल्याचे वनविभागाने सांगितले होते. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आयुष सचिन शिंदे याच्या घराच्या जवळ काही अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात आज पकडलेला बिबट्या जेरबंद झाला.हा बिबट्या पुर्ण वाढ झालेला ११ वर्षीय नर बिबट असुन सदर बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याची माहिती ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

Second leopard trapped in cage set by forest department in Umbraj
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार: एकाच रात्री दोन गोठयांवर बिबट्याचा हल्ला

पाच दिवसां पुर्वी उंब्रजच्या आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षीय बालकास बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने उंब्रज परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १० पिंजरे,१० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच वनविभाग व रेस्क्यु टीमचे २५ सदस्य या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

यावेळी वनपाल संतोष साळुंखे,वनमजूर बी के खर्गे,रेस्क्यु टीमचे सदस्य बाबाजी खर्गे,रोशन नवले,रोहित बोडके यांनी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेले. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्या जेरबंद झाल्याने उंब्रज परिसरात अजुन किती बिबटे आहेत हा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात आहे लवकरात लवकर बिबट्याच्या समस्येवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com