कोरोनाच्या उद्रेकामुळे मंचर शहरात कलम १४४ लागू 

mancha
mancha

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने मंगळवार ७ ते गुरुवार १६  जुलैपर्यंत शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

मंचर शहरात कोरोनाबाधितांची संख्या सहा झाल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करण्याची प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मंचर शहरात एकूण कोरोनाबाधित पाच रुग्ण गेल्या पंधरा दिवसात आढळून आले आहेत. प्रांताधिकारी मंचर जितेंद्र डुडी यांनी मंचर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यानुसार कलम १४४ लागू करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी वगळता कुणालाही मंचर शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

तसेच, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मंचर पोलिस व ग्रामपंचायत कारवाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपळगाव चौक आणि बसस्थानकानजीक असणाऱ्या मुळेवाडी रोडकडे पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. घोडेगाव रोड बाजारतळ आणि पिंपळगाव रस्त्यावरील शितळामाता मंदिराजवळ बांबू लावून रस्ते बंद केले आहे, अशी माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.

एकलहरे येथील गावठाण आणि लोंढेमळा परिसरात १ महिला, पारगाव येथील बालाजी कॉम्प्लेक्स येथे एक तरुण कोरोनाबाधित आढळल्याने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र केला आहे. तसेच, सदरचा भाग केंद्रस्थानी धरून ५ किलोमीटरचा परिसर पुढील आदेश येईपर्यंत बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com