सेल्फीपेक्षा सुरक्षा महत्त्वाची : भूषण गोखले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

- गिर्यारोहक, गिरप्रेमी संस्थांचा सन्मान

पुणे : जो कोणी उंचीवर जातो, त्याने पाय भक्कम रहायला हवे हे मी 'एनडीए'मध्ये शिकलो. पण आपल्याकडे अनेकजण हुल्लडबाजी करत सेल्फी काढत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू होतो. असे प्रकार टाळायला हवेत. सेल्फी काढायची असेल तर आधी कर्तृत्त्वाने स्वत:ची प्रतिमा तयार करा, मग काढा असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रोटरी क्‍लब ऑफ पुणे मेट्रो आणि गिरीप्रेमी संस्थेतर्फे गिर्यारोहक बचावदूतांचा आणि संस्थांचा गौरव भुषण गोखले यांच्या हस्ते व्यवसायिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गिरिप्रेमीचे अध्यक्ष उमेश झिरपे, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष मुकुंद चिपळूणकर, सचिव स्नेहा सुभेदार, निमंत्रक राजेश इंगळे, पद्मा शहाणे यावेळी उपस्थित होत्या.

मुंबईकरांनो तुम्हाला मिळतंय शुद्ध पाणी; राजधानी तळालाच

बचावदूत गुरुनाथ आगीवले (माहुली किल्ला), गणपत व्होळे (पेब किल्ला), संतोष दगडे (कर्जत), कोंडू वारे (कर्जत), बाळू धनगर (नाशिक), सुरेश बोडके (ट्रींगलवाडी, किल्ला इगतपूरी) आणि बचावकार्यात करणाऱ्या शिवदुर्ग मित्र ट्रेकिंग अँड एडव्हेंचर क्‍लब (लोणावळा), वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण (नाशिक), निसर्ग मित्र (पनवेल), महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स (महाबळेश्वर), भोसला ऍडव्हेंचर फाऊंडेशन (नाशिक), कर्तव्य बहुद्देशीय संस्था (पोलादपूर) यांचा सन्मान करण्यात आला.

शिवसेना खासदारांच्या राज्यसभेत जागा बदलल्या; महाशिवआघाडीचे दिल्लीत पडसाद 

गोखले म्हणाले, "महाराष्ट्रात हवाई दलाकडे वजनाने हलके हेलिकॉप्टर नाहीत, त्यामुळे बचाव कार्य करता येत नाही. काही खासगी हेलिकॉप्टर या बचाव मोहिमेत जोडले गेले तर अनेकांचे जीव वाचतील. रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्यांना मदत करून त्यांचे जीव वाचविण्यासाठी संवेदनशील झाले पाहिजे.''

झिरपे म्हणाले, "सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये गिर्यारोहण करताना अनेक अपघात घडतात. त्या भागात रहाणारे स्थानिक बचावदूत निस्वार्थपणे काम करतात. त्यांना मदत साहित्य व इतर प्रकारे मदत केली तर अनेकांचे प्राण वाचतील.''

बोडके म्हणाले, "इगतपूरी भागात मी शेतकरी आहे, पर्यटक किल्ले बघायला येतात. त्यांना कोणतीही अडचण आली की मी मदत करतो.''

सचिन मेहता म्हणाले, "हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, आमच्या पंखात बळ आले आहे.'' घाट चार वर्षापूर्वी धाक बहिरी या कड्यावरून दरीत पडलेले श्रीकांत डांगी यांनीही त्यांचे अनुभव कथन केले. राजेंद्र उत्तुरकर यांनी सूत्रसंचलन केले. तर स्नेहा सुभेदार यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security is more important than selfies says Bhushan Gokhale