esakal | ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; आता पीएमपीमधून प्रवास करता येणार!
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML_Bus

ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालविता येत नाही. तसेच रिक्षा, कॅबचे भाडे त्यांना परवडत नाही. त्यामुळे दवाखान्यात किंवा काही खरेदीसाठी बाहेर पडण्यावर त्यांना मर्यादा आल्या होत्या.

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; आता पीएमपीमधून प्रवास करता येणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीच्या बसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील 65 वर्षे वयापुढील नागरिकांना बसमध्ये प्रवास करण्यास आजपासून परवानगी देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने जाहीर केला आहे. दोन्ही शहरांत पीएमपीची वाहतूक 3 सप्टेंबरपासून सुरू झाली होती. मात्र, त्यातून 10 वर्षांच्या आतील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

एल्गार परिषद प्रकरण : गोरखे आणि गायचोर यांना 'एनआयए'नं घेतलं ताब्यात!​

मात्र, मुंबईत 'बेस्ट'ने ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासास परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर पुण्यातही ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये प्रवेश द्यावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नागरिक संघटना, स्वयंसेवी संस्थांनी पीएमपी प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी महापौर मुरलीधर मोहोळ, दोन्ही महापालिका आयुक्तांशी सोमवारी (ता.७) चर्चा केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय रेडिओ खगोलशास्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप काळाच्या पडद्याआड​

ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालविता येत नाही. तसेच रिक्षा, कॅबचे भाडे त्यांना परवडत नाही. त्यामुळे दवाखान्यात किंवा काही खरेदीसाठी बाहेर पडण्यावर त्यांना मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बस प्रवासाला परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासाला परवानगी दिली आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?​

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधअये पीएमपीच्या सध्या 477 बस 192 मार्गांवर धावत आहेत. गेल्या चार दिवसांत प्रवासी संख्या प्रती दिन वाढत असून सोमवारी (ता.७) ती सुमारे एक लाखांवर पोचली आहे. सोमवारी पीएमपीच्या तिजोरीत सुमारे 25 लाखांचे उत्पन्न जमा झाले आहे. नजीकच्या काळात ही प्रवासी संख्या आणखी वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image