कदमवाकवस्ती परिसरात खळबळ, एका दिवसात दोन कोरोनाबाधित 

जनार्दन दांडगे
गुरुवार, 21 मे 2020

लोणी स्टेशन व परिसरातील कन्टेनमेंट झोन उठवून 24 तासांचा अवधी उलटण्याच्या आतच दोन रुग्ण आढळले. त्यामुळे पुढील 28 दिवसांसाठी कन्टेनमेंट झोन लागू होणार, याची भीती निर्माण झाली आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील कदमवाकवस्ती येथे गुरुवारी (ता. 21) एका दिवसात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोणी स्टेशन व परिसरातील कन्टेनमेंट झोन उठवून 24 तासांचा अवधी उलटण्याच्या आतच दोन रुग्ण आढळले. त्यामुळे पुढील 28 दिवसांसाठी कन्टेनमेंट झोन लागू होणार, याची भीती निर्माण झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना चमकण्याची हौसच भारी!  

कदमवाकवस्ती येथे सापडलेल्या दोन कोरोनाबाधीत रुग्णांपैकी एक 62 वर्षीय रुग्ण पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे; तर दुसरा सत्तर वर्षीय रुग्ण हा हडपसर परिसरातील वैदूवाडी येथून लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती) येथील खासगी रुग्णालयात मागील दोन दिवसांपासून उपचार घेत आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. 

यूपीला निघालेलं जोडपं म्हणतंय, "हालात सामान्य हुए तो लौटेंगे...'  

याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डी.. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील पठारे वस्ती परिसरात राहणारी 62 वर्षीय व्यक्ती ही मागील चार दिवसापासून आजारी आहे. या व्यक्तीचा एक मुलगा खासगी वाहनावर; तर एक मुलगा पीएमपी बसच्या स्वारगेट डेपोचा चालक म्हणून कामाला आहे. त्यांना वडिलांना आजारी असल्यामुळे बुधवारी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट केली. त्यात संबंधित रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आला आहे. कोरोनाबाधीत व्यक्तीच्या दोन्ही मुलांच्या कोरोना टेस्ट ससून रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. त्यांच्या घरातील आणखी तीन महिलांना कोरोनाच्या टेस्टसाठी तत्काळ पुण्यात हलविले आहे. 

उद्धव ठाकरे यांना अमोल कोल्हे म्हणाले, "हे काम कराच...' 

तसेच, सत्तर वर्षीय रुग्ण वैदूवाडीतून उपचारासाठी दोन दिवसांसाठी कदमवाकवस्ती येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे संबंधित रुग्णांची केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली असल्याचे खासगी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पूर्व हवेली कोरोनामुक्त नाहीच 
कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत मागील महिनाभराच्या काळात नऊ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. उर्वरित सहा कोरोनाबाधीत रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी पोचले होते. सातवा व शेवटचा कुंजीरवाडी येथील रुग्ण आजच घरी आला होता. यामुळे दुपारपासून पूर्व हवेली कोरोनामुक्त झाल्याचा आनंद पूर्व हवेलीमधील नागरिक व आरोग्य विभाग साजरा करत असतानाच सायंकाळी दोन रुग्ण आढळून आल्याच्या बातम्या आल्याने आनंद मावळला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensation in Kadamwakvasti area, two corona in a day