esakal | प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक - वडेट्टीवार
sakal

बोलून बातमी शोधा

Separate meeting to solve the problems of Dam Affected Projects

अतिवृष्टी बाधितांचे पुनर्वसन आणि चारा टंचाईसाठी लागणारा निधी तातडीने दिला जाईल. तसेच, भामा आसखेड, पवनासह जिल्ह्यांतील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांची दहा दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक - वडेट्टीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अतिवृष्टी बाधितांचे पुनर्वसन आणि चारा टंचाईसाठी लागणारा निधी तातडीने दिला जाईल. तसेच, भामा आसखेड, पवनासह जिल्ह्यांतील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांची दहा दिवसांत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील सरकारी विश्रामगृहात गुरुवारी (ता. 20) मदत व पुनर्वसन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी संजय जाधव, साताऱ्याचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

वडेट्टीवार यांनी पुणे महसूल विभागातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. या सर्व जिल्ह्यांतील पुनर्वसनाची तातडीची कामे लक्षात घेवून त्यांचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे सादर करावा. त्याचबरोबर यापुढे जिल्ह्यातील मदत व पुनर्वसनाच्या कामांबाबतचा मासिक अहवालही पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या पाचही जिल्ह्यांतील कमी पडत असलेल्या निधीचा आढावा घेवून तो तातडीने दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. बहुजन कल्याण विभागाच्या विविध कामांचा आढावाही त्यांनी घेतला.

loading image