मोठी बातमी : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लस चाचणीची मिळाली परवानगी

योगीराज प्रभुणे
Monday, 3 August 2020

देशाचे औषध महानियंत्रक डॉ. वी. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीची मागणी चाचणी करण्याची परवानगी दिली.

पुणे : संपूर्ण जगभराचं लक्ष लागलेल्या कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. कोरोना लस संशोधनात सर्वांत आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्डच्या लसीची भारतात चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे औषध महानियंत्रक डॉ. वी. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीची मागणी चाचणी करण्याची परवानगी दिली. कोवीड19च्या विशेष या संदर्भात संपूर्ण चर्चा करून, शक्यतांचा अंदाज घेऊन निर्णय घेतला आहे. या समितीमधली एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलसाठी सुरुवातीला सुरक्षाविषयक डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) यांच्याकडे द्यायचा असतो. या डेटाचं मुल्यांकन डेटा सुरक्षा निरक्षण बोर्ड (डीएसएमबी) या संस्थेनं केलेलं असतं.' ऑक्सफर्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील निरीक्षणांचा अभ्यास केल्यानंतरच भारतात पुढील टप्प्यातील चाचणीला अनुमती देण्यात आली.

आणखी वाचा - कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करतंय अख्खं कुटुंब

अशी होणार चाचणी!
लस देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, चार आठवड्यांच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात येतील. यात पहिला डोस दिल्यानंतर 29 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर लसीची सुरक्षा आणि संबंधित व्यक्तीच्या शरिरात तयार झालेल्या अँटिबॉडिजची तपासणी केली जाईल. या चाचणीसाठी देशभरातून वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतील व्यक्तींची निवड करण्यात येईल.

आणखी वाचा - बुधवार पेठेतील त्या वस्तीबाबत पुणेकरांची मोठी मागणी

कोठे होतेय चाचणी?
ऑक्सफर्डच्या वतीने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहे. ब्रिटनमधील चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. ब्राझीलमध्येही या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तर आफ्रिकेतील देशांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झालेली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute got permission for covid vaccine test india