सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन आता मिळणार एकाच छताखाली

Solarmarts
Solarmarts

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागातून एम. टेक पूर्ण झाले. तेव्हा नोकरी करण्याऐवजी मित्रांच्या भागीदारीतून सौरविद्युत, सौरतापक यांचा पुरवठा करणारे स्टार्टअप सुरू केले; त्यातून सौरऊर्जेशी निगडित सर्व सेवा-सुविधा आणि मार्गदर्शन एकाच छताखाली पुरवणाऱ्या ‘सोलरमार्टस’ची कल्पना प्रत्यक्षात उतरली, सांगत होता सोलरमार्टस.इनचा संस्थापक निखिल समुद्रे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपारंपरिक ऊर्जास्रोतांशी निगडित वाढती बाजारपेठ कवेत घेण्यासाठी या नवउद्योजकाने ‘सोलरमार्टस’ नावाचे ऑनलाइन खरेदी, विक्री, सेवा-सुविधा आणि माहिती देणारे ‘मार्ट’ सुरू केले आहे. निखिल म्हणाला, की वेगाने वाढत चाललेल्या सौर बाजारपेठेत ग्राहकाला सौरविद्युत प्रकल्प बसवण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच त्याची पूर्ण माहितीही त्याच्याकडे नसते. त्यासाठी पीव्ही, केबल, ढाचा, बॅटरी आदी अनेक गोष्टी लागतात. यांच्या खात्रीलायक माहितीबरोबरच त्यांची खरेदीही ऑनलाइन पद्धतीने करणे शक्‍य होणार आहे.

सौर उत्पादनांच्या खरेदी विक्रीसह, मार्गदर्शन, थेट व्यवहार, माहितीचा खजिना आणि नोकऱ्यांची संधी देणारे हे देशातील पहिले स्टार्टअप आहे. 

मागील महिनाभरापासून मी ‘सोलरमार्टस’चा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरत आहे. सौर उपकरणे आणि सेवांबरोबरच त्यासंबंधीची उपयुक्त माहिती मिळते. तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी जॉब पोर्टलही यात उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास वाढत आहे. 
- सिद्धांत सुरसे, सौरउत्पादनांचे व्यावसायिक, नाशिक.

या गरजांतून स्टार्टअपची संकल्पना 

  • सौर बाजारपेठेतील वस्तूंचा दर्जा आणि किमतीबद्दल साशंकता
  • सौर उत्पादनांविषयी पुरेशी माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव
  • घराचे छत किंवा जागेनुसार सौर प्रकल्पांची रचनाही बदलते
  • इतर सुविधा, योग्य किमतीत वस्तू उपलब्ध होणे गरजेचे
  • नवीन नोकऱ्यांच्या माहितीचा अभाव

‘सोलरमार्टस’ देणार या सुविधा 

  • सौरविद्युत प्रकल्पांशी निगडित सर्व वस्तूंची खरेदी-विक्री
  • सौरतापक, सौरपंप, सौरबॅटरी, सौर कॅमेरा, सौर कुकर आदी
  • सौर बाजारपेठेशी निगडित लेख, माहिती, व्हिडिओ, कन्सल्टंसी
  • सोलारस्टोअरच्या माध्यमातून नवीन उत्पादन थेट घरपोच
  • सौर बाजारपेठेतील नोकऱ्यांची माहिती आणि अर्ज करता येणार

सोलरमार्टसचे फायदे 

  • ग्राहकांना योग्य दरात सेवा
  • विक्रेत्यांना खात्रीशीर ग्राहक आणि बाजारपेठ 
  • सौर उत्पादनांविषयी जनसामान्यांमध्ये माहिती आणि विश्‍वास वाढेल
  • ग्राहक देशातील कोणत्याही विक्रेत्याशी थेट संपर्क साधून निविदा मागवू शकतात

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com