esakal | युरिया मिश्रित पाणी पिल्याने सात शेळ्यांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

goat
युरियामिश्रित पाणी पिल्याने सात शेळ्यांचा मृत्यू
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : युरिया मिश्रित दूषित पाणी पिल्याने ढवळपुरी (ता. पारनेर) येथील मेंढपाळाच्या सात शेळ्या विषबाधा होऊन मृत झाल्या. मृत झालेल्या शेळ्यांपैकी दोन शेळ्या गाभण होत्या. ही दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास येथील खेबडेमळा शिवारात घडली.अशी माहीती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. जी.लामखेडे यांनी दिली.ढवळपुरी येथील नामदेव महादेव तांबे हे मेंढपाळ जुन्नर तालुक्यात उपजीविकेसाठी आले आहे. खेबडेमळा येथे ते सध्या मुक्कामी आहेत.आज सकाळी येथील संतोष रामदास डोंगरे यांच्या उसाच्या शेतातील टाकीतुन पाझरणारे पाणी शेळ्यांच्या पिण्यात आले. त्या नंतर तासाभरातच पोट फुगून सात शेळ्या मृत झाल्या. या मुळे हातावर पोट असलेले मेंढपाळ तांबे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लामखेडे यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळ्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन केले.या बाबत डॉ. लामखेडे म्हणाले शेतकरी डोंगरे यांनी उसाला खत देण्यासाठी टाकीतील पाण्यात युरिया विरघळवला होता. टाकीतून पाझरणारे युरिया मिश्रित पाणी शेळ्यांच्या पिण्यात आले. या मुळे विषबाधा होऊन सात शेळ्या उपचारापुर्वी मृत झाल्या.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

शेतकरी ठिबकद्वारे ऊस व इतर भाजीपाला पिकांना द्रवरूप रासायनिक खत देतात. ठिबकद्वारे द्रवरूप खत देण्यासाठी हे खत टाकीत विरघळून नळीवाटे पिकांना दिले जाते. प्रामुख्याने उन्हाळ्यात शेतात साठलेले पाणी शेळ्या व अन्य प्राणी पितात. रासायनिक खत मिश्रीत पाणी अतिशय विषारी असते.आशा दुर्घटना टाळण्यासाठी चाऱ्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळानी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. बी. जी.लामखेडे (पशुवैद्यकीय अधिकारी, नारायणगाव)

हेही वाचा: पिंपरी ; ‘मोफत बेड’साठी मागितले एक लाख